टीसीएस राज्यस्तरीय ग्रामीण आयटी क्विझ स्पर्धेत शृष्टी जाधवचे यश
टीसीएस राज्यस्तरीय ग्रामीण आयटी क्विझ स्पर्धेत शृष्टी जाधवचे यश
नागपूर/E T News
जमशेदपूर.Tata Consultancy Services (TCS) आणि कर्नाटक सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स, IT, BT आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण विभाग यांच्या द्वारे आयोजीत TCS ग्रामीण IT क्विझच्या क्युज स्पर्धेत पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाची१२ वी विज्ञान शाखेची कुमारी शृष्टी सुनील जाधव या विद्यार्थिनी रिजनल स्पर्धेत सहावा क्रमांक मिळवून स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव लौकीक केले.
ही क्विझ बेंगळुरू टेक समिट २०२४ चा एक भाग म्हणून आयोजित केली होती या क्विझमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि आभासी आणि भौतिक क्विझ शो देखील असतात. लहान शहरे आणि जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. शहर/निगम हद्दीतील शाळांचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकत नाहीत. ही क्विझ तंत्रज्ञान पर्यावरण, व्यवसाय, नवीन ट्रेंड यासह विविध क्षेत्रांमध्ये आणि पैलूंमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित करते. बँकिंग, शिक्षण, करमणूक, पुस्तके, मल्टीमीडिया, संगीत, चित्रपट, इंटरनेट, क्रीडा, गेमिंग यासारख्या आयटीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रांचा देखील प्रश्नमंजुषामध्ये समावेश असतो.एकूण ४०० स्पर्धकांमध्ये शृष्टी
जाधव या विद्यार्थिनीने सहावा क्रमांक मिळवून आपल्या यशाला गवसणी घातली.पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ सुधीर अग्रवाल , पर्यवेक्षक प्रा विश्वनाथ वंजारी यांनी. अभिनंदन केले व वडील सुनील जाधव यांनी मुलीचे तोंड भरून कौतुक केले.