सर्वोदय विद्यालय उमरी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

सर्वोदय विद्यालय उमरी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
सावनेर/प्रतिनिधी
तालुका सावनेर येथील सर्वोदय विद्यालय उमरी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आशा उल्हास निखाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या प्राणांगणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम तालीम कवायत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाहतूक पोलीस निरीक्षक श्री मुसलवार सर श्री भास्कर रामचंद्र कचडे सरपंच, श्री विनोद धनराज उलमाले उपसरपंच , माजी मुख्याध्यापक जनार्दन लक्ष्मण निखाडे ज्येष्ठ नागरिक नामदेवराव बोंडे, माजी पंचायत सभापती यादव रावजी ढोके, पंचायत समिती सभापती गोविंदरावजी ठाकरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक ठोंबरे मॅडम, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एस थेरे सर यांनी केले. आभार प्रदर्शन के एस चौधरी सर यांनी केले.