श्री दिगंबर जैन युवक मंडळाचे युवक-युवती परिचय संमेलन रविवारी

श्री दिगंबर जैन युवक मंडळाचे युवक-युवती परिचय संमेलन रविवारी
नागपूर/प्रतिनिधी
श्री दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाल) आणि महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 वा अखिल भारतीय वधू वर परिचय मेळावा रविवार 29 डिसेंबरला सकाळी 8 वाजता कविवर्य सुरेश भट्ट सभागृह, रेशमबाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सैतवाल मंदिराचे माजी अध्यक्ष दिलीप शिवणकर, मेळाव्याचे स्वागताध्यक्ष अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेचे राष्ट्रीय महामंत्री नितीन नखाते आहे. मेळाव्याचे उद्घाटन श्री जैन सेवा मंडळाचे माजी महामंत्री रमेश तुपकर करतील. सुमंगल स्मरणिकेचे विमोचन विमोचन सशस्त्र सीमा दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माजी उपमहानिरीक्षक डॉ. मिलिंद वासे करणार आहे. उपमहानिरीक्षक (से. नि.), प्रमुख अतिथी भास्कर विटाळकर विशेष अतिथी अखिल भारतीय पुलक मंच परिवार महाराष्ट्र झोन 6 चे अध्यक्ष सूरज जैन पेंढारी, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. मंजुषा फुलंबरकर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. संमेलनात सहभागी या कार्यक्रमास सकल जैन समाजाचे सहकार्य लाभले आहे. मेळाव्यात प्रवेशपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही.असे मेळाव्याचे मार्गदर्शक डॉ. नरेंद्र भुसारी यांनी कळविले आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रशांत भुसारी व कार्यवाह अविनाश शहाकर, महिला शाखेच्या अध्यक्षा मायाताई सावळकर, कार्यवाह अर्चना शहाकार यांनी युवक युवती त्यांच्या पालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
—————-