गोंगपा पार्टी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना मैदानात उतरवणार*
*संपूर्ण महाराष्ट्रात गोंगपा पार्टी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना मैदानात उतरवणार*
नागपूर/E T News
महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात उमेदरवाला रिंगणात उतरविण्यास गोंडवाणा गणतंत्र पार्टी तयारीला लागले आहेत. गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकारिणी यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ता मेळाव्यात विशेष बैठका घेण्यात आल्या. गोंगपा पार्टी ही महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल सक्रीय होऊन तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक विविध जिल्ह्यात 14 जुलै ते 16 जुलै पर्यंत गोंगप पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष विधायक तुलेश्वरसिंह मरकाम, राष्ट्रीय महासचिव श्याम सिंह मरकाम, राष्ट्रीय महामंत्री संतोष चंद्राकार, महाराष्ट्र प्रभारी बलवीरसिंह तोमर, विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 14 जुलै ला सरपंच भवन सिव्हील नागपूर येथे कार्यकर्ता मेळावा व बैठक आयोजित केली होती. यावेळी नागपूर, अमरावती, भंडारा, या तिन जिल्हाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत गोंगपा पार्टी ही आपली पूर्ण ताकतीने उमेदवाराला मैदानात उतरवून लढवण्यासाठी तयार आहे. याबाबत चर्चा झाली होती. विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुकी संदर्भात तिन दिवसीय दौऱ्यानंतर ठरवणार की कुठे कुठे निवडणूका लढवायचे या संदर्भात निर्णय घेतील. महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान विधानसभा निवडणुकी करीता संघटन मजबूत करण्यास एकत्रित आले आहे. गोंगपा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष विधायक तुलेश्वरजी मरकाम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधायक तुलेश्वरजी मरकाम म्हणाले की, महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी गोंडवाना गणतंत्र पार्टी ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी गोंडवाना गणतंत्र पार्टी आपल्या जमीनी स्तरापासून काम करण्यास तयारीला लागले आहेत. व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संगठणात्मक बैठकीला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकरीता पार्टी संघटन वाढीवर भर दिला जात आहे. महाराष्ट्रात गोगपा पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरीश उइके यांना विधानसभा निवडणुकी करीता आतापासून मजबूत करण्यासाठी व संगठण वाढविण्याकरीता जबाबदारी दिलेली आहे. यावेळी पार्टी चे संघटन मजबूत करण्यासाठी गोंगपा पाटीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधायक तुलेश्वर सिंह मरकाम सोबत महासचिव श्याम सिंह मरकाम राष्ट्रीय महामंत्री संतोष चंद्राकर महाराष्ट्र प्रभारी तथा महासचिव बलबिरसिंह तोमर राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला प्रकोष्ठ रेखाताई निकोरे महाराष्ट्र प्रदेशचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरीश उईके महासचिव सुधाकर आत्राम प्रदेश उपाध्यक्ष सुकलाल मडावी प्रदेश कोषाध्यक्ष महेशजी बम्हनोटे मध्यप्रदेश जिल्हा उपाध्यक्ष रंजना वामने भंडारा जिल्हा अध्यक्ष मंगेश धुर्वे अमरावती जिल्हा अध्यक्ष मुरलीधर मरसकोल्ह, नामदेव शेडमाके, नागपूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार उईके व समस्त पदाधिकारी व कार्यकारीणी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमांचे संचालन नागपूर जिल्हा अध्यक्ष महिला प्रकोष्ट च्या गंगाताई टेकाम यांनी तर आभार नागपूर शहर अध्यक्ष दिनेश सिडाम यांनी मानले.
👆