तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पोरवाल महाविद्यालयाचे सुयश
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पोरवाल महाविद्यालयाचे सुयश
कामठी/E T News
कामठी येथील निंबाजी आखाडा येथे आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका कोठेकर ( ४९ किलो गटातील अंडर १७)व दिशा राऊत(५० किलो गटातील अंडर १९)या दोन्ही विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळविले व जिल्हा स्तरावरील कुस्ती स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला . क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.विजेता विद्यार्थिनींच्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. विनय चव्हाण यांनी क्रीडा प्राध्यापिका मल्लिका नागपुरे यांना दिले.दोन्ही विजेता विद्यार्थिनींचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण उपप्राचार्य डॉ.सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक प्राध्यापक व्हि बी वंजारी यांनी अभिनंदन केले आहे.