शिवजयंती निमित्त महानिर्मितीच्या वतीने श्रीकृष्ण धाम स्लम वस्तीत गृहोपयोगी वस्तूचे नि:शुल्क वाटप

शिवजयंती निमित्त महानिर्मितीच्या वतीने श्रीकृष्ण धाम स्लम वस्तीत गृहोपयोगी वस्तूचे नि:शुल्क वाटप
शिवाजी महाराज एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक : पुरुषोत्तम वारजुरकर
नागपूर/ विशेष प्रतिनिधी
तथागत गौतम बुद्ध मानव संसाधन विकास संस्था खापरखेडा द्वारे श्रीकृष्ण धाम या झोपडपट्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कार्यक्रमप्रसंगी महानिर्मिती कंपनीचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुंबई पुरुषोत्तम वारजूरकर हे बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रेरणादायी असून प्रत्येकाला त्यापासून शिकण्याची गरज आहे असे मार्गदर्शन महानिर्मिती कंपनी मुंबईचे महाव्यवस्थापक वित्त व लेखा, संदेश मोरे यांनी केले. याप्रसंगी अतुल बोरकर उपमहाव्यवस्थापक मानव संसाधन कोराडी विद्युत केंद्र, सातकर सहा. महाव्यावस्थापक , वित्त व लेखा, कोराडी विद्युत केंद्र, नितीन काळे सहा महाव्यवस्थापक खापरखेडा विद्युत केंद्र, अमरजीत गोडबोले कल्याण अधिकारी कोराडी प्रकल्प, उमेश कांबळे अध्यक्ष, शक्ती गवंडी बांधकाम मजूर संघटना, राहुल बागडे विशेष कार्यकारी अधिकारी, लतिका मेश्राम, व्यवस्थापक मानव संसाधन, विद्युत केन्द्र, चंद्रपूर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतीश दुधाने यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कामकाजाची व मागील 11 वर्षापासून दरवर्षी राबविल्या गेलेल्या कार्यक्रमाची माहिती व संस्थेचा उद्देश समजावून सांगितला. या प्रसंगी गरीब व गरजू श्रमकार्डधारक 60 लाभार्थ्यांना स्टील डबे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात खापरखेडा व कोराडी विद्युत केंद्रातील प्रामुख्याने वर्कर्स फेडरेशन संघटना,मागसवर्गीय संघटना , विद्युत तांत्रिक कामगार संघटना तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतीश दुधाने, संचालन राहुल बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बाथो यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी सहारे, विकास कोचे, जॉन जोसेफ, दिनेश वरठी, मनीष भेंडारकर, सचिन विंचु, भोजराज शहाने इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले