Breaking
ब्रेकिंग

मानकापुरात सहा लाखांची घरफोडी, रोख रकमेसह दागिन्यांची चोरी + यासह आणखी इतर crime च्या बातम्या 

0 1 8 5 2 1

हद्दपार गुंडाचा शहरात मुक्तसंचार : दोघांना अटक

मानकापुरात सहा लाखांची घरफोडी, रोख रकमेसह दागिन्यांची चोरी     

*बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या दोघांचा मृत्यू     

*कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक : दोन अटकेत

*घरफोडीच्या दोन आरोपींना अटक

*सक्करदरा पोलिसांची हिमोग्लोबिन चाचणी      ———————————————————-

    नागपूर/E T News

शहर व ग्रामणी भागातून हद्दपार केल्यानंतरही विनापरवाना शहरात मुक्तसंचार करणा-या दोन गुंडांना पोलिसांनी अटक केली. यात एका हद्दपार महिलेचाही समावेश आहे. जरीपटका पोलिसांनी राबविलेल्या तपासणी मोहिमेत दोघेही गवसले. गोरेलाल मुन्ना उईके (३२, रा. न्यू इंदोरा, बाराखोली) आणि भारती सुरेश खरे (३५, रा. इंदिरानगर, गल्ली नंबर ११, जरीपटका) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

जरीपटका पोलिस पथकातील अधिकारी व अंमलदार हद्दपार आरोपी तपासणी मोहीम राबवित होते. त्यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी मध्यरात्रीनंतर १२.१० वाजताच्या सुमारास बाराखोली चौकाजवळ, पाहणी केली असता येथे गोरेलाल उईके हा सापडला. ताब्यात घेतल्यानंतर अभिलेख तपासला असता त्याला परिमंडळ क्रमांक ५ च्या पोलिस उप आयुक्तांनी १० मे २०२४ पासून ६ महिन्यांकरिता हद्दपार केल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे पोलिसांना गुंड प्रवृत्तीची असलेली भारती खरे ही हद्दपार केल्यानंतरही घरी परतल्याची माही मिळाली. त्यानुसार पोलिस मध्यरात्रीनंतर २.०५ वाजताच्या सुमारास तिच्या घरी पोहोचले. ती घरी आढळून आली. तिला १० मे २०२४ पासून ६ महिन्यांकरीता नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीतुन हद्दपार केल्याचे दिसून याप्रकरणी दोन्ही आरोपींविरूद्ध पोलिसांनी कलम १४२ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

————————————–

मानकापुरात सहा लाखांची घरफोडी रोख रकमेसह दागिन्यांची चोरी : गुन्हा दाखल

घराला कुलूप लाऊन कामानिमित्त बाहेर गेलेल्या एका व्यक्तीच्या घरी चोरट्याने ६ लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्याने आलमारीत ठेवलेली रोकड तसेच सोन्या-चांदिचे दागिने लांबविले. मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली.

प्लॉट नंबर डी/४२ गौसिया सोसायटी, प्रेमसेवा होस्टलजवळ कैलाश सोनुलाल धानोरिया (५१) वास्तव्याला आहेत. ते कामानिमित्त बाहेर गेले होते. या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील आलमारीत ठेवलेली १ लाख २० हजारांची रोकड तसेच सोन्या-चांदिचे दागिने चोरून नेले. ही घटना ७ ते ८ आॅगस्ट दरम्यान, घडली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

————————————–

बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या दोघांचा मृत्यू

शहरातील गणेशपेठ आणि तहसील पोलिस ठाण्यांतर्गत बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, गणेशपेठ येथे ८ आॅगस्ट रोजी, संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अनोळखी पुरूष ईसम अंदाजे ७० वयाचे हे आजारी स्थितीत मिळून आले. तसेच ९ आॅगस्ट रोजी, तहसील येथे मनमोहन फरसान दुकाना समोरील फुटपाथवर गोळीबार चौकात अनोळखी पुरूष ईसम अंदाजे ३० वयाचे हे बेशुध्द अवस्थेत मिळून आले होते. दोघांनाही मेयो रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून तसे वैद्यकीय सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेतलेली आहे.



३,०७३ वाहन चालकांवर कारवाई

लोकशाही वार्ता/नागपूर

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ५ तसेच एनडीपीएस कायद्यान्वये १ अशा एकूण ६ प्रकरणांत ६ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये २ प्रकरणांत २ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली ३ हजार ०७३ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख ५१ हजार ५५० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर शहर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. यापुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. परिणामी, वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे आवाहन करण्यात आले आहे.

———————————–

घरफोडीच्या दोन आरोपींना अटक

मुलीला शाळेतून आणण्याकरिता गेल्याचे निमित्त झाले आणि चोरट्यांनी तेवढ्यातच घरात हातसाफ केला. घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आलमारीत ठेखलेली रोकड चोरून नेली. चोरीतील दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या. बादल संजय संतापे (२५), मोहम्मद अहमद उर्फ सागर मोहम्मद ईकबाल (३०, दोन्ही रा. रमानगर, कामठी) अशी आरोपींची नावे आहेत.

कळमना येथील ओमसाईनगर येथे प्लॉट नंबर २६७ मध्ये फिर्यादी यादव बाळाजी बाराई (६०) त्यांची पत्नी आणि मुलीसह राहतात. दोघेही घराला कुलूप लाऊन मुलीला शाळेतून आणण्याकरिता गेले होते. यादरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी आलमारीत ठेवलेली ३३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ६ आॅगस्ट रोजी, दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ च्या अधिकारी आणि अंमलदारांनी मिळालेल्या माहितीवरून बादल संतापे, मोहम्मद अहमद उर्फ सागर मोहम्मद ईकबाल दोघांनाही ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्यांनी उपरोक्त घरातून रोकड चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ७० हजारांची दुचाकी जप्त केली आहे. आरोपींना जप्त मुद्देमालासह कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

————————————

कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक : दोन अटकेत

कत्तलीसाठी गोवंशांची वाहतूक करणा-या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ३ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून कारवाईत पोलिसांनी बोलेरो पीकअप वाहनासह ३ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विकास अरूण पिंगळे (२४, रा. रामपूर मंडीसर, ता. मोहाळी, जि. भंडारा), स्वप्नील गोपालराव बालपांडे (२२ वर्ष रा. मोहगाव, देवी, ता. मोहाळी, जि. भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत.

कामठी ठाण्यांतर्गत पेट्रोलिंगवेळी पोलिसांनी ८ आॅगस्ट रोजी, दुपारी २.१० ते १.४५ वाजताच्या दरम्यान, कमसरी बाजार रोड येथे एका बोलेरो पिकअप वाहन (एमएच ३६ एए ०४५५)वर धाड टाकली. वाहनाची तपासणी केली असता त्यात ३ गोवंशीय जनावरे आढळून आली. जनावरांना अत्यंत निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले होते. सर्व जनावरांची अवैधरित्या कत्तलीकरिता वाहतूक होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पिकअप वाहनाचा चालक आणि त्याचा साथिदार विकास पिंगडे आणि स्वप्नील बालपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन गोवंशीय जनावरांसह बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ३ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व गोवंशीय जनावरांची सुटका करून त्यांना गोरक्षण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहेत. कामठी ठाण्याचे पोलिस अंमलदार कुश ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरू द्ध कलम ५(ब), ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९९५, सहकलम ११(१) (ड) प्राणी कुरता अधिनियम-१९६० अन्वये गुन्हा दाखल करत दोघांनाह अटक केली आहे.

—————————————

सक्करदरा पोलिसांची हिमोग्लोबिन चाचणी

‘वॉर अगेन्स्ट अ‍ॅनिमीया कॅम्पेन’ या योजने अंतर्गत सक्करदरा पोलिस ठाण्यात हिमोग्लोबिन टेस्ट कॅम्प घेण्यात आला. कॅम्पमध्ये डॉ. जयश्री राठी यांचे मार्गदर्शनात फॅन्को इंडिया फार्मासिटीकल प्रा.लि. कंपणीचे वैद्यकीय सेवा पुरविणारे अधिकारी सचिन पवार व त्यांच्या चमूकडून पोलिसांची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली.

कॅम्पमध्ये डॉ. राठी यांनी विभागातील महिला अधिकारी व अंमलदार यांना ताणतणावामुळे त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन कमजोरी येणे, डिप्रेशन येणे, विसरभोळेपणा वाढणे, शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होणे या समस्या येतात. त्यामुळे, काळजी व उपचार याबाबत मार्गदर्शन केले. नागपूर शहर पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचारी पोलिस कर्तव्य पार पाडताना त्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. याकरीता पोलिस आयुक्तांच्या आदेशाने परिमंडळ क्रमांक ४ चे पोलिस उप आयुक्त, विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांच्या उपस्थितीत हा कॅम्प पार पडला.

————————————–

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे