मंगळागौर स्पर्धेची महाअंतिम फेरीचे आयोजन – मध्य नागपुरातून ३५ मंडळांचा सहभाग
मंगळागौर स्पर्धेची महाअंतिम फेरीचे आयोजन – मध्य नागपुरातून ३५ मंडळांचा सहभाग
नागपूर/E T News
मातृभूमी सेवा फाऊंडेशन मध्य नागपूरद्वारे आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून निर्मित राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त मध्य नागपुरात महिलांसाठी प्रथमच भव्य मंगळागौर स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे आयोजन शनिवार दि १७ ऑगस्ट २०२४ रोजी स्व राजे तेजसिंहराव भोसले सभागृह, तुळशीबाग महाल येथे सकाळी १०-४ वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
संध्या ४ वाजता बक्षीस वितरण सोहळा दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ अमृताताई फडणवीस यांचे हस्ते आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा नागपूर शहर अध्यक्ष सौ प्रगतीताई पाटील, माजी महापौर सो अर्चनाताई डेहनकर, भाजयुमो प्रदेश महामंत्री सौ शिवानी दाणी वखरे, शहर महामंत्री सौ अश्विनीताई जिचकार आणि भाजप शहर व मंडळाचे महिला पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहतील.
महाअंतिम फेरी स्पर्धेत ११ उत्कुष्ट मंडळांना भव्य रोख पुरस्कार, सन्मान चिन्ह तसेच श्रावण क्वीन, उत्कृष्ट निवेदकांना प्रत्येकी १ पैठणी असे भव्य पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या मंडळास विशेष प्रशिक्षण देऊन १० मिनिटात एक पारंपरिक गीत, खेळ सादर करायचे आहे. या स्पर्धेसाठी मातृभूमी सेवा फाउंडेशनचे सौ. सारिकाताई नांदुरकर, सौ. कविता इंगळे, सौ. रेखाताई निमजे, निकीता पराये, श्वेता निकम (भोसले), रजनी जैन, दिपाली नंदनवार, कल्पना मानापुरे, सौ सुजाता काथवटे, अनिता काशिकर, मेघा पिसे, सविता उमाठे रश्मी फडणवीस, मंजुषा मोहिते, करुणा गावंडे, सुनंदा गावंडे, करूणा अत्राम, गीता पारडीकर, माया ठवली, वंदना डीवरे, भारती अरमरकर पदाधिकारी परिश्रम घेत असून या श्रावणमास निमित्य आयोजित अभिनव कार्यक्रमास महिलांनी उपस्थित राहून सहभागी मंडळांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन डॉ. श्रीरंग वैराडपांडे, मातृभूमी सेवा फाऊडेशन मध्य नागपूर यांनी केले आहे.