Breaking
ब्रेकिंग

दिघोरीतील मोबाईल शॉपीत दरोडा : २४.३२ लाखांचे साहित्य पळविले “बनावट एफडीच्या आधारे बँक आफ इंडियाची फसवणूक *शहरात राजरोसपणे होतेय गांजाची विक्री

0 1 8 5 2 1

दिघोरीतील मोबाईल शॉपीत दरोडा : २४.३२ लाखांचे साहित्य पळविले

नागपूर/E T News

संतकृपा प्रोव्हीजन्स नावाची मोबाईल शॉपीतून लाखोंडा डल्ला मारला. दरोडेखोरांनी दुकानातून तब्बल २४ लाख ३२ हजार ५७१ रुपयांचे विविध कंपनीचे मोबाईल व इतर साहित्य पळविले. तीन आरोपींनी दुकानात चोरी केली.

हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. दिघोरी, उमरेड रोड सर्वश्रीनगर येथील प्लॉट नंबर ५७ येथे फिर्यादी सचिन दामोदर गावंडे (४०) हे राहतात. त्यांचे हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत येणा-या दिघोरी चौक येथे श्री संतकृपा प्रोव्हीजन्स नावाची मोबाईल शॉपी आहे. दुकानात विविध कंपनीच्या मोबाईलसह मोबाईल संदर्भातील अन्य साहित्य (असेसीजीज) विक्री केली जाते. शुक्रवारी त्यांनी रात्री १० वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद केले आणि घरी निघाले. दुस-या दिवशी शनिवारी १४ सप्टेंबरला ते सकाळी दुकानात आले असता दुकानाचे शटर उचकावलेले दिसून आले. दुकानात त्यांनी बघितले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात १३ ते १४ सप्टेंबरच्या रात्री तीन चोरट्यांनी मिळून दुकानाचे शटर उचकावले आणि आत प्रवेश केला. दुकानात ठेवलेले विविध कंपनीचे तब्बल ८९ मोबाईल, तसेच तीन घड्याळ, ईअर बर्डस यासह अन्य साहित्य एकूण २४ लाख ३२ हजार ५७१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. घटने संदर्भात त्यांनी हुडकेश्वर पोलिसात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक साखरकर यांनी आरोपी विरूद्ध कलम ३०५ (अ), ३३१ (४) भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

———————————–

शहरात राजरोसपणे होतेय गांजाची विक्री

शहरात अंमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढले असून आता या पदार्थांची खुलेआम रस्त्यावर विक्री होत असल्याचे पुढे येत आहे. अशाच प्रकारे रस्त्यावर गांजा विक्री करणा-या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून ४ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. मोहम्मद शाहीद उर्फ अजीदा वल्द अनवारूल हक (२७, रा. ईमलीबाग चौक, गालीब रोड, कामठी) असे या आरोपीचे नाव आहे. जुनी कामठी पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांना मो. शाहीद हा गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी त्याच्यावर रात्री ८ वाजतापासून पाळत ठेवली. त्यानंतर रात्री ८.५० वाजता त्यालला पापा का बगीचा समोरील शितला माता मंदिरापुढे असलेल्या रस्त्यावर त्याला ताब्यात घेतले. येथे तो गांजाची विक्री करत असताना आढळला. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ४ हजार रुपयांचा ३८९ ग्रॅम गांजा मिळून आला. त्याच्या विरूद्ध पोलिसांनी त्य कलम ८ (क), २०(ब) (२) (अ) एनडीपीएस अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

—————————————

बनावट एफडीच्या आधारे बँक आफ इंडियाची फसवणूक

अ‍ॅसेट कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्र चालकाने त्याच्या एका साथिदारासोत मिळून कंपनीसह बँक ऑफ इंडिया पाचपावली शाखेची ६ कोटींची फसवणूक केली. ग्राहकांचे बनावट एफडीची कागदपत्रे तसेच बायोमॅट्रिक घेत त्यांच्याकडून पैसे स्वीकारले आणि ते कंपनीत न भरता पैशांचा अपहार केला. आशिष यशवंत जोगे (४०, रा. प्लॉट नंबर ३१, दयालू हाऊसिंग सोसायटी, बौध्द विहाराजवळ, जरीपटका) आणि दत्ता वैजनाथ पांचाळ (३२, रा. लिंबाडा, ता. निलंगा, जि. लातूर) अशी आरोपींची नावे आहेत.

मध्यप्रदेशातील अशोका विहार कॉलोनी, भोपाल येथे फिर्यादी राकेश रामाधार बंमनोटिया (३६) राहतात. अ‍ॅसेट लिमीटेड कंपनीमध्ये ते एरिया मॅनेजर पदावर कामावर आहेत. ही कंपनी देशपातळीवर विविध बँकांसोबत अ‍ॅग्रीमेंटद्वारे ग्राहक सेवा केंद्र चालविण्याचे तसेच लिमेटेड बँकिंगची सुविधा देण्याचे काम करते.

आरोपी आशिष जोगे याला कंपनीकडून साईप्रसाद कॉम्प्लेक्स, ब्लॉक नंबर ३, इंदोरा चौकात ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळाली होती. ९ आॅगस्ट दरम्यान, त्याने साथिदार दत्ता पांचाळ याच्यासोबत मिळून बँक आॅफ इंडियाच्या ग्राहकांचे बनावट एफडीचे कागदपत्रे तयार केले. त्यांचे बायोमॅट्रिक मशीनद्वारे फिंगरप्रीट घेतले आणि ग्राहकांकडून पैसे स्वीकारले. हा पैसा आरोपींना कंपनीत जमा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता त्यांनी हा पैसा स्वत: वापरत कंपनी व बँक आॅफ इंडियाची एकूण ६ लाख रुपयांची फसवणूक केली. सबब प्रकार लक्षात आल्यानंतर राकेश बंमनोटिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून तसेच अर्ज चौकशीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपींविरूध्द कलम विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

————————————–

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे