विद्यापीठ मार्गदर्शिका मागासवर्गीयांच्या उपयोगासाठी” पुस्तिकेचे लोकार्पण व निःशुल्क वितरण
विद्यापीठ मार्गदर्शिका मागासवर्गीयांच्या उपयोगासाठी” पुस्तिकेचे लोकार्पण व निःशुल्क वितरण
नागपूर/E T News
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे माहिती व मार्गदर्शन केन्द्र सुरू करण्यात येत असून विद्यापीठाद्वारे प्रकाशित “विद्यापीठ मार्गदर्शिका मागासवर्गीयांच्या उपयोगासाठी” ह्या पुस्तिकेचे लोकार्पण व निःशुल्क वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते.
कार्यक्रमाचे उद् घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर मानकर (भावसे) मुख्य वनसंरक्षक, वनविभाग महाराष्ट्र शासन तर डॉ. राजू हिवसे, कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. पुरणचंद्र मेश्राम माजी कुलसचिव तथा मुख्य सल्लागार मागासवर्गीय कर्मचारी संघटना, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक मनिष झोडापे उपकुलसचिव, मा. वि. क., रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, दिनेश दखणे अध्यक्ष, मागासवर्गीय कर्मचारी संघटना रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर हे होते.
सदर कार्यक्रम कृषी महाविद्यालय वसतिगृहाजवळ, दीक्षाभूमी, नागपूर येथे उत्साहात पार पडला.