पुराच्या पाण्यात वृद्ध वाहून गेला – लाखनी तालुक्यातील घटना
पुराच्या पाण्यात वृद्ध वाहून गेला – लाखनी तालुक्यातील घटना
भंडारा/ E T News
लाखनी तालुक्यातील पाथरी येथून चुलबंद नदीचां प्रवाह दुथडी भरून वाहत असताना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मौजा पाथरी येथील रहिवासी रूपादास रामजी वलथरे वय वर्ष 58 हा चुलबंद नदी च्या दिशेने गाय हाकलण्यासाठी गेला असता तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला.
सद्यस्थितीत पालांदूर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने व महसूल अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ यांच्या मदतीने पुरात वाहून गेलेल्या वलथरे याचा शोध घेणे सुरू आहे. नदीचां प्रवाह जास्तीत जास्त वाढत जात असल्यामुळे पाण्यामध्ये बोटही टाकता येत नाही तसेच नदीकाठाच्या गावातील तलाठी कोतवाल व पोलीस पाटील यांना नदीकाठावरील भागात शोध सुरू ठेवण्यास तहसीलदार निंबाळकर यांनी सांगितले आहे. परंतु उशिरापर्यंत वाहून गेलेला वलथरे याचा शोध लागलेला नव्हता.