Breaking
ब्रेकिंग

ASI ललित पंजाबराव टिकारिया यांची पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी : 200 च्या वर पुरस्काराने करण्यात आले सन्मानित

0 1 8 5 2 2

ASI ललित पंजाबराव टिकारिया यांची पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी

भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन  ललित  टिकारिया  यांचा सेवानिवृत्ती सत्कार करताना

ललित टिकरिया यांना  200 च्या वर पुरस्काराने  करण्यात आले सन्मानित

कुटुंबीयांसह अविस्मरणीय सत्कार

 

भंडारा/E T News 

  ललित पंजाबराव टिकारिया हे नागपूर विद्यापीठातून कला शाखेची स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर सन १९९१ मध्ये पोलीस शिपाई या पदावर भंडारा जिल्हा पोलीस दलात रुजू झाले जालना येथे पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून गुणवत्ता यादीत पास झाले. पोलीस मुख्यालय भंडारा येथे कमांडो बाबत प्रशिक्षण घेतले सन १९९२ पासून नक्षल प्रभावित गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी वरिष्ठचे मार्गदर्शनावरून वरीष्ठासोबत राहून रात्र दिवस अभियान केले अनेक नक्षल हालचालीवर नियंत्रण ठेवण्यास वरिष्ठासोबत राहून मदत केली. 

      सन १९९३ पासून शहिद श्री अशोक कामटे, यांचे सोबत शिवाजी तुमरेडी दलम, रावजी तुलावी दलम व नागझिरा दलम सोबत नक्षक फायरिंग मध्ये त्यांचे खांद्याला खांदा लावून नक्षल भागामध्ये नक्षलवाद्यांचे घातक कार्यवाहीवर वेळीच प्रतिबंध करण्यास मदत केली सतत २ वर्ष त्यांचे सोबत जंगल अभियान व कोमिंग ऑपरेशन राबवून वरिष्ठासोबत राहून नक्षली कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यास मदत केली. त्यामुळे काही पो. स्टे. च्या हद्दीत एकही नक्षल कार्यवाही झाली नाही. तसेच उपविभागामध्ये गोपनीय माहिती काढून अवैध दारू विक्री आणि अवैध जुगाराची माहिती काढून अनेक अवैध दारू व्यवसायावर व अवैध जुगरावर रेड करण्यास मोलाचे सहकार्य केले. त्याबाबत सुद्धा त्यांना अनेक बक्षीस मिळालेले आहेत. जुलै १९९५ ते २००६ पर्यंत स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथे कार्यरत असतांना वरिष्ठासोबत दरोडा, जबरी चोरी, खून, अफरातफरी, जबरी संभोग, खुणाचा प्रयत्न यासारख्या महत्वाच्या गुन्ह्यात वरिष्ठाचे मार्गदर्शनात राहून तपास कामात मदत कार्य केले. तसेच हरविलेल्या इसमांचे शोधाबाबत व अनोळखी मर्ग बाबत वरिष्ठाशी पत्रव्यवहार, गॅजेट प्रसिद्धी व संबंधित पो. स्टे. चे संपर्कात राहून भंडारा जिल्ह्यात हरवविलेल्या इसमचा शोध घेण्यास मदत केली. आणि अवैध दारू व्यवसायावर व अवैध जुगारावर रेड करण्यास मोलाचे सहकार्य केले. त्यानंतर त्यांचे स्थानांतर पो. स्टे. लाखनी येथे झाले. ते सन २००६ ते माहे फेब्रुवारी २००९ पर्यंत पो. स्टे. लाखनी येथे कार्यरत असतांना त्यांनी क्राईम नियंत्रण चे काम केले. 

       त्यांनी वरील प्रमाणे केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत त्यांना अनेक बक्षीस मिळाले आहेत. २०१५ मध्ये पोलीस DGP मुंबई यांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेत एमओवी मध्ये तसेच विविध ठिकाणी प्रामाणिकपणे व कार्यकुशलतेने काम केल्यामुळे त्यांना २०७ पेक्षा जास्त बक्षीस मिळाले आहेत.

————————–

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 2

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे