माकपा कार्यालयात गणराज्यदिन उत्साहात साजरा

माकपा कार्यालयात गणराज्यदिन उत्साहात साजरा
नागपूर/ विशेष प्रतिनिधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज शनीचरा येथील कार्यालयात गणराज्यदिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम पक्षाचे सचिवमंडळ सदस्य काॅ.मनोहर मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.नंतर काॅ.विठ्ठल जुनघरे यांनी सर्व उपस्थितांकडुन प्रास्ताविकाचे वाचन व संविधानरक्षणाची शपथ वाचवुन घेतली , एकीकडे संविधानाच्या आधारावर खासदार म्हणून निवडून येतात आणि संविधान निर्माण केलेल्या व्यक्तिचा अपमान केला जातो, सांसद गरीमेचा उघड़पने अपमान करित देश्याच्या गृहमंत्री पदी सत्तारूढ़ होतात, हे 76 व्या गणतंत्र दिनानिमित्त्य देशाचे दुर्भाग्य आहे असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना काॅ.मुळे यांनी सांगितले की मनुवादी फॅसिस्ट भांडवलदारी मोदी सरकारने या देशाचे संविधान मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे.तेव्हा संविधान रक्षणाकरीता मोठ्या त्याग व बलिदाना करीता तयार रहावे लागेल.या प्रसंगी ऐडवोकेट विजय फूलकर, नितिन ढोबले, प्रवीण हिंगवे, तुलसीराम तेलघरे, अंशुल सामंत, दिलीप देशपांडे, वैभव जोगलेकर, अजय ताडपल्लीवार, मोठ्या प्रमाणात एमएसएमए व लाल बावटा वाहतुक कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
—————-