नेहरू नगर भोजापूर येथे महापरिनिर्वाण दिन

नेहरू नगर भोजापूर येथे महापरिनिर्वाण दिन
भंडारा/प्रतिनिधी
लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर, ता. जि. भंडारा च्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे दि. ६ डिसेंबर २०२४ ला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व दलितांच्या मुक्तिलढ्याचे प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष योगेश मेश्राम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलीत करुन बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन केले. बाबासाहेबांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करून यावेळी आदरांजली वाहण्यात आली. तसेच सामुहिक बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष योगेश मेश्राम, संस्था कोषाध्यक्ष ऋषी गोस्वामी, मा. नरेंद्र गणविर, प्राचार्य नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.), प्रा. डॉ. राहूल भोरे, आर. एम. पटेल कॉलेज भंडारा, प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे, एन. जे. पटेल कॉलेज मोहाडी, प्रा. विजय गणविर, आर्ट अँड कामर्स कॉलेज पेट्रोलपंप (ठाणा), सुरेंद्र मेश्राम, सहा. शिक्षक ग्रामविकास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोंढी (जवाहरनगर) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. अस्मिता धारगावे, दिपाली भोरे, राहूल कठाने, मल्हारी भोरे, रुख्मीणा भोरे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहूल भोरे यांनी केले.