होली मदर इंग्लिश प्रि-प्रायमरी स्कुलमध्ये पालखी व वृक्षदिंडी उत्साहात साजरी
होली मदर इंग्लिश प्रि-प्रायमरी स्कुलमध्ये पालखी व वृक्षदिंडी उत्साहात साजरी
अमरावती/E T News
राजहील नगर येथील होली मदर इंग्लिश प्रि-प्रायमरी स्कुलमध्ये १६ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पालखी व वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यामध्ये भारतीय संस्कृतीची जाणीव व्हावी व आपली मराठी संस्कुती विद्यार्थ्यामध्ये रुजावी या मुख्य हेतूने आयोजित विठ्ठल पालखीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी होवून हा उत्सव शाळेत मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमला सौ. वानखडे ताई मोकलकर ताई, चौधरीताई प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या. पालखीचा उत्साह मुलांमध्ये ओसंडून वाहत होता. मुलांनी कुर्ता-पायजामा आणि मुलींनी परकर-पोलक अशी वेशभुषा परिधान करून कार्यक्रमाला हजेरी लावली होती.विठ्ठल नामाच्या गजरात पालखीला सुरूवात करून परिसरातील विठ्ठल मंदिरात नेण्यात आले. वृक्षदिंडीच्या माध्यमातून झाडे लावा-झाडे जगवा हा संदेश देण्यात आला. पालखीचा समारोप विठ्ठल मंदिरामध्ये आरती करून व प्रसाद वितरण करून करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग बघून जनू पंडरपूरच अवतरल्याचा भास होत होता.विठ्ठलाच्या वेशभुषेत साहेम पायघन, रुख्मिणी कु. मृणाल ढोलवाडे व नामदेव महाराज ,तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई या वेशभुषा विद्यार्थ्यांनी साकारल्या. कार्यक्रमाचे सचालन सौ.रोशनी गावडे मॅडम, तर आषाढी एकादशीचे महत्व तुंगार मॅडम यांनी पटवून दिले.