कामठीच्या माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे यांच्या मातोश्रींचे मरणोत्तर नेत्रदान

कामठीच्या माजी नगराध्यक्ष मायाताई चवरे यांच्या मातोश्रींचे मरणोत्तर नेत्रदान
नागपूर/प्रतिनिधि
नगर परिषद कामठीच्या माजी अध्यक्ष, गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्या आद. मायाताई चवरे यांच्या मातोश्री स्मृतिशेष लीलाबाई नामदेवराव चवरे यांचे दि.28 नोव्हेंबर 2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
गुरूदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वरदादा रक्षक यांनी मला याची कल्पना दिली. मी मायाताईं सोबत बोलून महात्मे नेत्र पेढीला मायाताईं च्या घरी जाऊन नेत्रपटल घेण्याचे सांगीतले. दरम्यान सर्व वैद्यकीय प्रक्रीया पूर्ण केली. सतत मायाताई व नेत्रपेढी च्या संपर्कात राहीलो. मातोश्रीचे नेत्रपटल घेतले व अठ्ठेचाळीस तासाच्या आत देशातील दोन अंध नागरिकाच्या डोळ्यात ते प्रत्यारोपीत करण्यात आले.
मायाताईने मृत्यूनंतरही आईला दोन जिवंत अंधां च्या डोळ्यात नेत्र रूपाने शिल्लक ठेवले. हा मानव कल्याणाचा विज्ञानवादी, क्रांतिकारक निर्णय घेणाऱ्या मायाताई चवरे यांचे आपण सर्वांनीच अभिनंदन केले पाहिजे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सेवादल शिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, मराठी अभ्यास मंडळ, दि. शेड्युल्ड कास्ट अॅन्ड बुद्धिस्ट पेंशनर असोसिएशन, नागपूर यांच्या वतीने आम्ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत.
————————————