Breaking
ब्रेकिंग

नाशिकला जाणारा १६७ किलो गांजा पकडला. दोघे अटकेत: भंडारा पोलिसांची कारवाई

0 1 8 5 2 1

नाशिकला जाणारा १६७ किलो गांजा पकडला  : दोघे अटकेत *भंडारा पोलिसांची कारवाई

भंडारा / E T News 

ओरिसा राज्यातून नाशिक येथे जाणारा १६७ किलो गांजा भंडारा पोलिसांच्या पथकाने पकडला. ही कारवाई भंडारा शहरातील बिटीबी मार्केट परिसरात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

सुमित सुभाष थोरवे रा.आळंदी देवाची ता. खेड जिल्हा पुणे, रविंद्र कृष्णा शिंदे रा. गंगापूर रोड नाशिक, तुषार भोसले रा. आडगांव शिवार नाशिक, सुरज रा. नाशिक अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

महिन्द्रा एक्सयुव्ही क्र . एमएच १५ ईपी ४३७२ ने दोन इसम ओरिसा राज्यातून भंडारा मार्गे नाशिक येथे गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन भंडाºयाचे पोलिस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी यांनी पथक नेमून नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सदर वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान सदर महिन्द्रा एक्सयुव्ही ही शहरातील बिटीबी मार्केट परीसरातील यार्डमध्ये पार्क केलेली दिसून आली. त्या वाहनामध्ये सुमित सुभाष थोरवे आणि रविंद्र कृष्णा शिंदे हे मिळून आले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता मागील भागात ७ प्लास्टीक बोरीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा असल्याचे दिसून आला. आरोपींना गांजा वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी गांजा हा तुषार भोसले व सुरज यांच्या सांगण्यावरुन ओरीसा येथून आणला असून नाशिक येथे घेऊन जाणार असल्याचे सांगितले.

जप्त करण्यात आलेला गांजा १६७.१०० कि. ग्रॅम असून त्याची किंमत २५ लाख ६ हजार ५०० रुपये आहे. पोलिसांनी गांजा आणि वाहन असा एकुण ४५ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यात चारही आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडाराचे पोलिस गोकुळ सुर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक दिपक चालुरकर, हनुमंत फरताडे, पोलिस हवालदार क्रिष्णा बोरकर, बालाराम वरखडे, विजय डोयले, अजय कुकडे, सुनिल राठोड, नरेंद्र झलके, कोमल ईश्वरकर, राजेश पांडे, महेश रघुवंशी यांनी केली.

 

भंडारा कनेक्शनचा शोध

भंडारा शहरात अनेक दिवसांपासून गांजाचा व्यापार वाढला असून तरुणाई त्याच्या अंमलाखाली आली आहे. पोलिसांनी जप्त केलेला गांजाचे वाहन हे शहरातील बिटीबी मार्केटच्या यार्डमध्ये पार्क केले होते. त्यामुळे गांजाची खेप भंडारा येथेही पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात भंडारा येथील काही व्यापाºयांचाही सहभाग असल्याची माहिती असून पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. नाशिक, भंडारा ते ओरिसा असा योग्य तपास झाल्यास मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे.

1/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे