दोन वाहनांच्या भीषण अपघात दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू – अमरावती-नागपूर हायवेवरील घटना
दोन वाहनांच्या भीषण अपघात दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू – अमरावती-नागपूर हायवेवरील घटना
अमरावती/E T News
राष्ट्रीय महामर्गावरील गौरी ईन हॉटेल समोर २५ जुलैला रात्री १० वजताच्या सुमारास वॅगनार आणि अज्ञा
त वाहनांची समोरासमोर धड दिली. या भिषण अपघातामध्ये वॅगनार यार चारचाकी वाहनातील दोन इसमांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला असुन तिन लोक जखमी आहे. घटनेचा पुढील तपास गाडगेनगर पोलिस करीत आहे.
सविस्तर असे की, विजय मदनकर ,वय ५० रा.उमरी,अकोला, नकुल तोडकर वय, ३६ रा.अकोला, संदीप गावडे, मुकेश सराफ यांच्यासह एक इसम असे एकूण पाच जण हे अमरावती येथे खरेदी विक्रीचा व्यवहार करण्याकरीता आले होते. खरेदी विक्रीचा व्यवहार आटोपल्यानंतर ते सर्व लोक अमरावती -नागपूर रोडवरील गौरि ईन या हॉटेलमध्ये जेवायला गेले.जेवन आटोपल्यानंतर ते अकोला दिशेने जात असतांना गाडी विरुध्द दिशने घेतल्यामुळे समोरून येणाºया वाहनाने त्याच्या वाहनाला जबर धडक दिली. ज्यामध्ये विजय मदनकर ,वय ५० रा.उमरी,अकोला, नकुल तोडकर वय, ३६ रा.अकोला, या दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर संदीप गावडे, मुकेश सराफ यांच्यासह एकाला जबर मार लागल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.वाहतुकीला खोळंबा होत असल्यामुळे कें्रनच्या सहायाने वाहन बाहेर काढण्यात आले.विशेष म्हणजे मृत पावलेले दोघेही हे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे समजते.अज्ञात वाहनाचा गाडगेनगर पोलिस तपास करीत आहेत.