Breaking
ब्रेकिंग

मंत्र्यांच्या खासगी सहायकाच्या व्हिजिटिंग कार्डवर चक्क राष्ट्रीय राजमुद्रा !

0 1 8 5 2 1

मंत्र्यांच्या खासगी सहायकाच्या व्हिजिटिंग कार्डवर चक्क राष्ट्रीय राजमुद्रा !

गडचिरोली, ता. ३ : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे खासगी सहायक मिलिंद डोंगरे यांनी आपल्या व्हिजिटिंग कार्डवर चक्क देशाचे राष्ट्रीय राजमुद्रा (राजचिन्ह) अंकित करून आपले व्हिजिटिंग कार्ड संपूर्ण शासकीय कार्यालयात वितरण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशाची राजमुद्रा अशा प्रकारे वापरण्याचे कोणतेही अधिकार नसताना त्यांनी केलेले कृत्य कायदेभंग करणारे असल्याने त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार मिलिंद डोंगरे यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे पर्सनल असिस्टंट या नावाने व्हिजिटिंग कार्ड छापले आहे. मात्र त्या व्हिजिटिंग कार्डवर राजचिन्हसुद्धा प्रकाशित केले आहे. त्यामुळे या व्हिजिटिंग कार्डची सर्वत्र चर्चा रंगली आहे. काही कायदेतज्ञांकडून संबंधित व्हिजिटिंग कार्डबाबत चर्चा केली असता कायदेतज्ञांचे म्हणणे असे आहे की, शासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या काही विशिष्ट संविधानिक पद असलेल्या व्यक्तीलाच आपल्या व्हिजिटिंग कार्डवर राज्यचिन्ह प्रकाशित करण्याचे अधिकार आहेत. इतर कोणालाही आपल्या व्हिजिटिंग कार्डवर अथवा लेटर पॅडवर राजचिन्ह छापता येत नाही. मात्र मिलिंद डोंगरे यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या खासगी सहायक असल्याचे सांगत आपल्या व्हिजिटिंग कार्डवर राजचिन्ह कोरले आहे. त्यामुळे या विषयाची चांगलीच चर्चा आता जिल्हाभरात होऊ लागली आहे. या विषयाची शासनाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे हे व्हिजिटिंग कार्ड शासकीय कार्यालयातच मिलिंद डोंगरे वापरत असल्याची माहितीदेखील मिळाली आहे. त्यामुळे आता शासन या गंभीर प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकशाही वार्ता व इतर काही पत्रकार हे बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांना भेटायला गेले असता बांधकाम विभागाच्या झाडाच्या कुंडीच्या बाजूला पडलेल्या कचऱ्यात हे व्हिजिटिंग कार्ड फार वाईट अवस्थेत सापडले व्हिजिटिंग कार्ड कचऱ्यासोबत पडलेला होता. त्यामुळे राजचिन्हाचा अपमानदेखील झाला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीदेखील करण्यात येत आहे. नेमके बांधकाम विभागात हे व्हिजिटिंग कार्ड गेले, तरी कसे याबाबतदेखील कुजबूज सुरू झाली आहे. मंत्री महोदयांच्या खासगी सहायकाला बांधकाम विभागात कोणते काम होते, याबाबतदेखील आता चांगली चर्चा जिल्हाभरात रंगू लागली आहे बांधकाम विभाग म्हणजे जिल्ह्याचे आर्थिकदृष्ट्या मोठे विभाग आहे. त्यामुळे मंत्री महोदयांच्या खासगी सहायकाला येथे नेमके कोणते काम आहे, याबाबतदेखील आता शंका-कुशंका व्यक्त केली जात आहे. 

डोंगरे म्हणतात , मंत्री महोदयांच्या अनुमतीनेच कोरले राजचिन्ह….

या गंभीर विषयाची दखल घेत मिलिंद डोंगरे यांना केली असता ते म्हणाले की, आपण मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे स्विय सहायक असल्यामुळे आपणाला आपल्या व्हिजिटिंग कार्डवर राजचिन्हाचा वापर करता येतो. मीदेखील शासकीय यंत्रणेचा भाग आहे. आपल्याला विश्वास नसेल तर आपण मंत्री महोदयांशी चर्चा करू शकता, असेही ते म्हणाले.

 

आपण कोणतीही परवानगी दिली नाही : मंत्री धर्मरावबाबा आत्राम

यासंदर्भात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना माहिती विचारली असता मिलिंद डोंगरे यांनी आपल्या व्हिजिटिंग कार्डवर राजचिन्ह प्रकाशित करणे चुकीचे आहे. आपण मिलिंद डोंगरे यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही अथवा ते कोणत्याही शासकीय यंत्रणेचा भाग नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे

————————————-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे