Breaking
ब्रेकिंग

रोजच्या जेवणात मिलेटचे (भरडधान्य) सेवन आरोग्यास हितकारक : राजेशकुमार मालवीय

0 1 8 5 2 1

रोजच्या जेवणात मिलेटचे (भरडधान्य ) सेवन आरोग्यास हितकारक : राजेशकुमार मालवीय

नागपूर,/E T News

खाद्य संस्कृतीचे महत्त्व शरीराशी संबंधित आहे जागतिक मिलेट वर्ष म्हणून 2023 हे वर्ष घोषित करण्यात आले आमचे पूर्वज हे ज्वारी, नाचणी इत्यादी भरड धान्याचा उपयोग आपल्या रोजच्या जेवणात करायचे. त्यामुळे त्यांचे घातक रोगांपासून बचाव व्हायचा असे उद्गार ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयामध्ये आयोजित मिलेट भरड धान्य या विषयांवर आयोजित कार्यक्रमात भारतीय आदिम जाती सेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष व आमच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री *राजेश कुमार मालवीय* यांनी आपले मत मांडताना वरील उद्गगार काढले. कार्यक्रमाची प्रमुख अतिथी डॉ. स्वाती पडोळे* कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हणाला की आजच्या काळात फास्ट फूडचे फॅड फार प्रमाणात वाढले आहे, या पिझ्झा, बर्गर, मैद्यापासून बनविले जाणारे खाद्यपदार्थांचे चे सेवन अलीकडच्या काळात खूप प्रमाणात वाढले आहे. हे पदार्थ शरीरास अपायकारक आहे आणि हेच पदार्थ तरुणांना आपल्याकडे आकर्षित करतात परंतु त्यांनी या पदार्थांचे सेवन न करता मिलेट (भरडधान्य)सेवन करायला पाहिजे.

  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ *. बी.टी.वाघ, आयुर्वेदाचार्य* ,* विद्यार्थ्यांचे संवाद साधताना म्हणाले की, आमच्याकडे आम्ही भाकरी नाचणी आणि लाख खायचो लाखेत खूप पौष्टिक गुणधर्म आहेत, ते असेही म्हणाले की गहू आणि तांदूळ यांचे सेवन फार कमी करायला पाहिजे कारण त्यात ग्लुटेन असते जे शरीरासाठी पोषक नाही. ग्लुटेन मुळे 90 प्रकारचे रोग आपल्या शरीरात होतात.

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य *डॉ. महेंद्र कुमार मेश्राम* आपले अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, संस्कृती आमचे पोषण करते, ताकतवर विज्ञानाच्या दृष्टिकोन शिकवते, त्यांनी भारतीय संविधान आणि आरोग्य यांचे सांगड घालून विद्यार्थ्यांचे संवाद साधला. 

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. शालिनी तोरे यांनी संविधान प्रास्तविकेच्या वाचनाने केली. या कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन प्रा. दिपरत्न राऊत यांनी केले, तर आभार प्रा. शालिनी तोरे यांनी मांडले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तरवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे