घरफोडी करणारी टोळी अडकली जाळ्यात ; सहा लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
घरफोडी करणारी टोळी जेरबंद, सहा लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वर्धा/E T News
घरफोडी करणारी टोळी जेरबंद करत ११० ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असा ६ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने केली.
बोरगाव (मेघे) येथे ३० जून रोजी घराच्या दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागीणे, रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला. घरफोडीचा गुन्हा क्लिस्ट व गंभीर स्वरूपाचा असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने अत्यंत चिकाटीने तपासात कौशल्याचा वापर करून भिमसिंग सबजीतसिंग टाक (वय ३२), रा. गिट्टीखदान बोरगाव (मेघे), जंगसिंग पंजाबसिंग टाक (वय ३३), रा. वडनेर, ता. हिंगणघाट या दोघांना निष्पन्न केले. गुन्ह्याबाबत चौकशी केली असता बुलडाणा जिल्ह्यातील एक साथीदार सतनामसिंग प्रतापसिंग बावरी (वय ३०) रा. शेंदला ता. मेहकर जि. बुुलढाणा हा सुध्दा सोबत असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्यास गुजरात राज्यातील मेहसाना येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या ताब्यातून तीन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या, २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट, ३४ हजार ४०० रुपये रोख, असा ६ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देलाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या निर्देषानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी, नरेंद्र पराशर, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकीसन इप्पर, नितीन ईटकरे, संघसेन कांबळे, अरविंद इंगोले, मिथुन जिचकार, दिनेश बोथकर यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार प्रशांत वंजारी, पंकज भरणे, श्रावण पवार, वैभव जाधव करीत आहेत.