Breaking
ब्रेकिंग

…शेण कुणी खाल्लंय : वनपरिक्षेत्र अधिकारी निलंबित : 32 लाख 68 हजारांचा शेणखत खरेदी घोटाळा प्रकरण

0 1 8 5 0 5

शेण कुणी खाल्लंय… वनपरिक्षेत्र अधिकारी येलकेवाड निलंबित

32 लाख 68 हजारांचा शेणखत खरेदी घोटाळा

राजुरा/तालुका प्रतिनिधी

             राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रातील गवत रोपवणातील शेणखत खरेदी प्रकरणात 32 लाख 68 हजारांच्या घोटाळा प्रकरणात विरूर स्टेशनचे तत्कालीन प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीत दोषी आढळल्याने मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी ही कारवाई केली. या घोटाळ्यात सहभागी असलेले दोन वनपाल व सहा वनरक्षक यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा कलम 1979 नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून या सर्वांची विभागाचे बाहेर बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यातील रक्कम दोषींकडून वसूल करण्यात आली  असली तरी नक्की शेण कोणी खाल्लंय याचा शोध घेणे सुरू आहे.

                विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवड केल्यानंतर गवत व झाडांच्या वाढीसाठी शेणखत टाकले जाते. परंतू जुलै ते नोव्हेंबर २०२४ या काळात शेणखत खरेदी केल्याचे दर्शवून तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी प्रत्यक्षात शेणखत खरेदी व गवत रोपवनात शेणखत मिसळण्याची कामे केली नाही. याऐवजी जेसीबी द्वारे कामे करण्यात येऊन खर्च करण्यात आला. नियमानुसार त्याच हेड खाली दुसरे काम करायला वनविभागाची परवानगी घेणे गरजेचे असते मात्र येलकेवाड यांनी विभागाची परवानगी न घेता काम केले. या संदर्भात संबंधित वनपाल व वनरक्षक यांच्याशी संगनमत करून देयके तयार केली. 

                यासंदर्भात विरूर स्टेशन येथील गजानन ढवस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीचे गंभीर स्वरूप बघता मुख्य वनसंरक्षक यांनी चौकशी समिती गठीत केली. उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी या प्रकरणाचा तपास करून 4 एप्रिल 2025 रोजी मुख्य वनसंरक्षक यांचेकडे अहवाल सादर केला. या तपासात समितीला वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड व अन्य कर्मचारी दोषी आढळले. या घोटाळ्याची रक्कम वनपरिक्षेत्र अधिकारी, दोन वनपाल व सहा वनरक्षक यांचेकडून वसूल करण्यात आली आणि वन विभागांतर्गत कारवाई करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे