Breaking
Breaking

देवाचिये द्वारी होतेय चेंगराचेंगरी ! मृत्युमुखी पडूनिया जातोय देवाचिया घरी !! चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू

0 2 0 2 9 1

देवाचिये द्वारी होतेय चेंगराचेंगरी ! मृत्युमुखी पडूनिया जातोय देवाचिया घरी !!

तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू

आध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनसाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर लायनीत उभे आहेत. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी लायनीत उभे राहायला सांगितले तेव्हा ही चेंगराचेंगरीची घटना घडली.

तिरुपतीला जावून बालाजींचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपतीला जावून बालाजींचं दर्शनही घेतात. तिरुपतीचं बालाजींचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे. पण याच मंदिरात अतिशय हृदय हेलावणारी घटना घडली आहे.जी चिंतानिर्माण करणारी आहे.दर्शन घेण्यासाठी पास घेण्यासाठी तब्बल ४ हजार भाविक उभे होते, अशी माहिती मिळत आहे.

धार्मिक स्थळांमध्ये किंवा मंदिरात भक्तांची होणारी गर्दी खर तर हा चिंतनाचा विषय आहे.मंदिरात होणारी गर्दी,चेंगराचेंगरी हा नेहमीचा चिंतेचा विषय राहिला आहे..या समस्येवर मंदीर व्यवस्थापनाला नियंत्रण ठेवता आले नाही..ना भक्तांनी टाळता आली. गर्दी होत असताना भक्तांनी देखील गर्दी करण्याचे टाळले पाहिजे ..मंदिरात किती लोकांना प्रवेश द्यावा,याचे पद्धतशीर नियोजन हवे..नियोजनाअभावी भक्तांना आपले प्राण गमवावे लागत आहे..भक्तांना नियंत्रित करण्यासाठी, व सहज सुलभ दर्शन घेता यावे म्हणून भारतातील काही धार्मिक संस्थांनी टोकन पद्धत सुरू केली आहे.या टोकन पद्धतीत शुल्क आकारले जाते..शुल्क देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे…सामान्य भक्तांची संख्या हजारोंच्या संख्येत यामुळे स्वाभाविक मंदिरात गर्दी होणारच..दर्शन मिळावे म्हणून भक्त कोणत्याही प्रकारचा मार्ग अवलंबतात . यामुळें गर्दी नियंत्रित करणे शक्य होत नाही…परिणामतः चेंगराचेंगरी होवून भक्त त्यात तुडवले जातात.तिरुपती बालाजी मंदिरात नेमका हाच प्रकार घडला.वैंकुठद्वार सर्वदर्शनम टोकन वितरणाच्या दरम्यान हा प्रकार घडला. तिरुपती मंदिरातील विष्णू निवासम परिसरात ही दुर्घटना घडली.

हे टोकन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. त्या गर्दीत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तामिळनाडूमधील एका भक्ताचाही या मृतांमध्ये समावेश आहे. या चेंगराचेंगरीनंतर चार जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मंदिर प्रशासन अपयशी

देवाचे दर्शन व्हावे म्हणून भक्त मंदिरात गर्दी करतात…अशा वेळी गर्दीवर नियंत्रण ठेवणे हे मंदिर प्रशासनाचे काम..तिरुपती येथे लाखोच्या संख्येत भक्त दर्शनासाठी येतात…मंदीर प्रशासनाला हे का उमगले नाही…भारतातील मंदिरात होणारी गर्दी व चेंगराचेंगरी हा आजचा विषय नाही..या आधी देखील

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.ही घटना जुलै २०२४ मध्ये घडली.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ मांढरदेवीचं मंदिर एका डोंगरावर वसलेलं आहे. याला काळुबाईचं मंदिर म्हणूनही ओळखलं जातं.मांढरदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी हा लहान डोंगर चढावा लागतो. त्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दुतर्फा पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत.

दरवर्षी जानेवारी महिन्यात डोंगरावर मांढरदेवीची यात्रा असते. हा उत्सव जवळपास १५ दिवस चालतो.२५ जानेवारी २००५ रोजी दरवर्षीप्रमाणे ‘त्या’ दिवशीही जवळपास ३ लाख भक्त उत्सवासाठी जमले होते. यात मोठ्या संख्येने महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुलं होती.उसळलेल्या गर्दीतून प्रत्येक जण जमेल तसं देवीचं दर्शन घेत होते. बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती. त्यामुळे डोंगराच्या एकाबाजूला बोकड कापले जात होते.

दुपारच्यावेळी गर्दीत अचनाक गोंधळ उडाला. काही भाविक घसरून खाली पडले आणि गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते. या तंबूंनाही आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाला आणि शेकडोंचा बळी गेला आणि अनेकजण जखमी झाले.

जानेवारी २०२२ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ लोकांचा मृत्यू झाला. जखनमींचा आकडा यापेक्षाही अधिक होता.

एकंदरीत काय तर ,मंदिरातील भक्तांची गर्दी, चेंगराचेंगरी हा नेहमीच गंभीर प्रश्न म्हणून उभा ठाकला असताना मंदीर प्रशासन व भक्त यापासून बोध का घेत नाही…शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात चेंगराचेंगरी घडते का? उत्तम नियोजन , व उत्तम प्रशासन म्हणून शेगाव येथील गजानन मंदीर प्रसिद्ध आहे.भारतातील मंदिराची शेगाव पासून शिकण्यासारखे आहे.

प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा

९५६१५९४३०६

—-++——-++++————-

 

तिरूपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू : चिंतनाचा विषय ? सविस्तर बातमी…

आंध्रप्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार तिकीट काऊंटरवर टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ज्यांना श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

वास्तविक, वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजेच TTD तिरुमला येथील भाविकांना दहा दिवसांसाठी वैकुंठ द्वार दर्शन देणार आहे. १० जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत दर्शन घेता येणार आहे. ९ जानेवारीला पहाटे ५ वाजल्यापासून या गेटवरून दर्शन टोकन दिले जाणार आहे. हे एसएसडी टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. TTD ने तिरुपती आणि तिरुमला येथे SSD टोकन वितरित करण्यासाठी काउंटर उभारले आहेत. दरम्यान, ९ जानेवारीला सकाळी ५ वाजता या केंद्रांवर १०, ११ आणि १२ तारखेसाठी १ लाख २० हजार टोकन वितरित केले जाणार आहेत. पण त्याआधीच भक्तांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे ही घटना घडली परंतु आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणली आहे.

नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

वास्तविक, वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजेच TTD तिरुमला येथील भाविकांना दहा दिवसांसाठी वैकुंठ द्वार दर्शन देणार आहे. १० जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत दर्शन घेता येणार आहे. ९ जानेवारीला पहाटे ५ वाजल्यापासून या गेटवरून दर्शन टोकन दिले जाणार आहे. हे एसएसडी टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती. TTD ने तिरुपती आणि तिरुमला येथे SSD टोकन वितरित करण्यासाठी काउंटर उभारले आहेत. दरम्यान, ९ जानेवारीला सकाळी ५ वाजता या केंद्रांवर १०, ११ आणि १२ तारखेसाठी १ लाख २० हजार टोकन वितरित केले जाणार आहेत. पण त्याआधीच भक्तांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे ही घटना घडली परंतु आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण आणली आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भाविकांचा मृत्यू झाल्याने तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर त्यांनी घटनेतील जखमींना मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा देखील केली आहे.

मुख्यमंत्री नायडूंनी उच्चस्तरिय बैठकीत घेतला आढावा

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी या घटनेप्रकरणी उच्चस्तरिय बैठक बोलावून आढावा घेतला आहे. DGP, TTD EO, जिल्हाधिकारी, SP यांच्यासमवेत चेंगराचेंगरीच्या या घटनेचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा मृत्यू हे अतिशय दु:खद आहे. भाविक मोठ्या संख्येने येणार हे माहित असताना त्यानुसार व्यवस्था का करता आली नाही, असा सवाल मुख्यमंत्री नायडू यांनी केला. मृतांची संख्या वाढू नये, यासाठी सीएम नायडू यांनी जखमींना चांगले उपचार मिळवून देण्यासाठी आणि मृतांचा आकडा वाढू नये यासाठी दक्ष राहण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तर मुख्यमंत्री उद्या स्वत: घटनेतील जखमींची भेट घेणार आहेत आणि परिस्थितीचा प्रत्यक्षरित्या आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

——————————–

 

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 2 9 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

One Comment

  1. श्री संत गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट शेगाव यांचेकडून काही धडे घेतले गेले पाहिजेत.मग ते शिर्डी असो वा इतर धार्मिक स्थळे. ट्रस्ट करण्यासारखे एकच ठिकाण ‘ श्री संत गजानन महाराज ‘ देवस्थान,शेगाव (महाराष्ट्र).

Leave a Reply to Milind Gaddamwar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे