अवैध दारू विक्रीसाठी स्थानिक नेत्यांचा पाठींबा की पोलिसांचा आशीर्वाद?
अवैध दारू विक्रीसाठी स्थानिक नेत्यांचा पाठींबा की पोलिसांचा आशीर्वाद?
काटोल (संदीप माहूरकर)
काटोल बस स्टॅन्डलगत असलेल्या कांचन हॉटेल मध्ये उघडपणे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, २ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी राज्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद असतानाही या हॉटेलमध्ये डबल रेट ने दारू विक्री सुरू होती, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या हॉटेलच्या मालकाचा भाऊ स्थानिक पत्रकार असल्याने त्याचा प्रभाव दाखवून पोलीस प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. त्यामुळेच “स्थानिक नेत्यांचा पाठींबा की पोलिसांचा आशीर्वाद?” असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे.
कायद्याचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची दारू विक्री सुरू असल्याने परिसरातील शिस्त बिघडत आहे. नागरिकांना मद्यधुंद व्यक्तींच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे.
या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार का, की हा अवैध धंदा असाच सुरू राहणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.




