महिलांनो स्वावलंबी शिक्षण घ्या, तरच अत्याचार थांबतील : अध्यक्ष ऊर्मिला ठाकरे
खामगाव/प्रतिनिधी
बहुउद्देशीय समाज जागृती महिला मंडळ महाराष्ट्र राज्य व महिला अत्याचार निवारण केंद्र अंतर्गत ‘राष्ट्रीय महिला चर्चा परिषद’ आणि ‘राष्ट्रीय ऊर्मी सन्मान पुरस्कार’ सोहळा दि.०७ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी केशव नगर,घाटपुरी नाका, खामगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अध्यक्षस्थानी साहित्यिका तथा सामाजिक कार्यकर्त्या संस्थेच्या सचिव वनश्री डॉ. ऊर्मिलाताई ठाकरे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सौ. अर्चना गणेश सोनोने, प्रा. सौ. रुपाली काशीराम वाघमारे, सौ. वनिता चंदु निंबोळकर, सौ. इंदुताई सु. शेगोकार उपस्थित होत्या.
सुरूवातीला सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून दीपप्रज्वलन करण्यात आले. साहित्यिका सौ. रुख्मिनी रवींद्र काकडे, आदर्श उद्योजिका सौ.संध्या उत्तमराव पद्ममने, आदर्श शिक्षिक सौ. अर्चना गणेश सोनोने, आदर्श कर्मचारी सौ. सुनंदा मनोज पानझाडे, व सौ. कमल श्याम पद्ममने,उत्कृष्ट गृहिणी म्हणून सौ. रेखा सूर्यकांत निंबोळकर यांना “राष्ट्रीय ऊर्मी सन्मान पुरस्कार” शिल्ड, प्रमाणपत्र, पुस्तके व बुके देवून गौरण्वित करण्यात आले.
प्रास्ताविक सौ. लक्ष्मी काकडे यांनी केले.तर राष्ट्रीय महिला परिषदेच्या अध्यक्षा ऊर्मिलाताई ठाकरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, “महिलांनो शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. उच्च शिक्षण घ्या पण स्वावलंबी शिक्षण घ्या जेणेकरून तुम्ही अर्थाजन करून निर्भय आणि बिनधास्तपणे जगू शकाल आणि अत्याचारही थांबतील. अर्थाशिवाय अर्थ नाही हे त्रिवार सत्य आहे.
नंतर क्रमशः प्रमुख अतिथी प्रा. सौ. अर्चनाताई सोनोने, सौ. रुपाली वाघमारे, सौ. इंदुताई शेगोकार, सौ. वनिता निंबोळकर यांनीही आपले विचार” व्यक्त केले. या महिला परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या सौ. पुष्पा चिम, रेखा निंबोळकर, कमल पदमने, संध्या पदमणे, लक्ष्मी काकडे, नंदा माठे,उषा चंदनकार, मीरा वानखडे, चंद्रभागा सोनोने, उज्ज्वला शेगोकार, शितल चिमणकार, ललीता काकडे
रेखा निबाळकर, छाया सुरवाडे,कल्पना चिमकर, रेखा निंबोळकर , संगीता काकडे, संध्या सुरडकर, कुसुम पदमणे, यशोदा पानझाडे, कमल वाघमारे,सुमन घोपे, गीता वानखडे, शुभांगी इंगळे, प्रमिला पानझाडे,कामीनी चिम, अर्चना सोनोने, ललीता नजरधने, इंदु शेगोकार, वंदना घोपे, प्रमिला निंबाळकर, पुष्पा चिम, ज्योती सुरडकर, संगीता गव्हाळे, सुनिता पानझाडे, राजकन्या माठे, नेहा राजगुरु,सुनंदा पानझाडे, मंजुळा डुकरे, शोभा वानखडे, सुर्वणा गव्हाणे, सुविता डुकरे, वनिता निंबोळकर, मंगला तायडे, चंद्रभागा सोनोने, सहआदि महिलांनी राष्ट्रीय महिला परिषदेच्या चर्चेत सहभाग घेतला.
संचलन ज्योती सुरळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ऊर्मिला सोनोने यांनी केले. अतिशय उत्साहात राष्ट्रीय महिला परिषदेची सांगता झाली.*


