Breaking
महाराष्ट्र

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉ. हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचे लोकार्पण सरसंघचालक आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी

0 2 0 2 9 1

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉ. हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचे लोकार्पण सरसंघचालक आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी

(संतोष सिंह लांजेवार)

नागपूर/विशेष प्रतिनिधी

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या अभिनवभारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरातील परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचा लोकार्पण समारोह शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता वारंगा येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी दिली

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या 1) प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचे लोकार्पण, 2) प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार मुला-मुलींच्या छात्रावासाचे भूमिपूजन आणि 3) प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुलाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या लोकार्पण समारोहाचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी भूषवतील.

या कार्यक्रमाला सारस्वत अतिथी या नात्याने श्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री व पालकमंत्री, श्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, अर्थराज्यमंत्री श्री आशिषजी जयस्वाल उपस्थित राहतील. कविकुलगुरू कालिदास ‘संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक पूर्वकुलगुरू डॉ. पंकज चांदे, पूर्वकुलगुरू प्रो उमा वैद्य, खासदार श्री श्यामकुमार बर्वे, आमदार श्री. समीर मेघे यांची विशेष उपस्थिती राहतील. कुलसचिव डॉ. देवानंद शुक्ल, अभिनवभारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसर, वारंगाचे संचालक मो कृष्णकुमार पांडेय विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत.

अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसर, वारंगा सर्वप्रथम काळडोंगरी येथे महाराष्ट्र शासनाने 2015 मध्ये 50 एकर जागा विश्वविद्यालयाच्या विस्तारासाठी प्रदान केली, त्यावेळचे विभागीय आयुक्त श्री अनुप कुमार यांनी तसा जीआर तत्कालीन कुलगुरू प्रो उमा वैद्य यांना सोपविला, त्यानंतर काळडोंगरी ऐवजी एज्युकेशन हब करण्याच्या दृष्टीने ट्रिपल आयटी, महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ यांच्यासह कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाला विस्तारित शैक्षणिक परिसरासाठी वारंगा येथे 50 एकर जागा मिळाली. ही जागा प्राप्त होताच 2017 च्या सप्टेंबर मध्ये खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. तत्कालीन कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी या परिसरातील विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला. या नियोजित आराखडयानुसार कामाला सुरुवात झाली. त्यानुसार कंपाउंड बॉल, ट्रान्समीटर बसविला गेला आणि प्रो पेन्ना यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळात शैक्षणिक भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली. या शैक्षणिक भवनासाठी रूसा कडून 5 कोटींचे अनुदान प्राप्त झाले. प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली या अनुदानातून सध्याचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवन आकाराला आले आहे.

या शैक्षणिक भवनात साहित्य, ज्योतिष, दर्शन, बहुशाखीय संस्कृत विषयातील अभ्यासक्रमांचे परिचालन होईल. तसेच अत्याधुनिक ग्रंथालय, संगणक केंद्र इ. ची सोय उपलब्ध राहील. येत्या काळात संस्कृत व प्राच्यविद्येसाठी आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, पारंपरिक शास्त्राध्ययनासाठी आंतरराष्ट्रीय गुरुकुल आणि अत्याधुनिक विषयांचा अभ्यास असा प्राचीन ते अर्वाचीन विषयांचे अध्ययनकेंद्र हे अभिनवभारती वारंगा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसराचे ठळक वैशिष्टय असेल. याशिवाय या परिसरात अध्ययन करणा-या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी मुला-मुलींच्या स्वतंत्र छात्रावासाची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे. या छात्रावासांमध्ये संस्कृत अध्ययन करणा-या विदेशी छात्रांकरितादेखील निवासव्यवस्था करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी संबोधित केले. कुलसचिव डॉ. देवानंद शुक्ल, अभिनवभारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसर, वारंगाचे संचालक प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, अधिष्ठाता प्रो. कविता होले, विद्यापीठ नियोजन विकास मंडळाचे संचालक प्रो. प्रसाद गोखले, जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोकारे विशेषत्वाने उपस्थित होते.

————–

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 2 9 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे