Breaking
महाराष्ट्र

आय.एम.ए. संघटनेच्या भूमिकेला होमिओपॅथिक संघटनेचा विरोध : होमिओपॅथिक डॉक्टरांवर अन्याय 

0 2 0 2 9 1

आय.एम.ए. संघटनेच्या भूमिकेला होमिओपॅथिक संघटनेचा विरोध : होमिओपॅथिक डॉक्टरांवर अन्याय 

नागपूर/विशेष प्रतिनिधी

I.M.A. संघटनेने शासन निर्णयाला विरोध करू नये व शासनाने M.M.C. मध्ये नोंदणी संबंधी घेतलेला निर्णय बदलू नये, अशी मागणी HIMPAN या होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली.

होमीयोपैथीक इंटिग्रेटेड मेडीकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र हि महाराष्ट्रातील होमियोपैथीक डॉक्टरांची नोंदनीकृत संघटना असुन मागील 35 वर्षा पासुन डॉक्टरांच्या समस्या व त्यांचेवर होणा-या अन्याया विरुध्द लढणारी संघटना आहे.

महारष्ट्र शासनाने वाढती लोक संख्या व त्या प्रमाणात डॉक्टरांची कमतरता व ग्रामीण व अतीदुर्गम भागातील आरोग्याची दखल घेऊण होमीयोपॅथीक डॉक्टरांना 2014 मध्ये एक वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉर्डन फार्मकोलौजी हा ब्रीज कोर्स देऊन अॅलोपैथीक चिकित्सा करण्याची परवानगी देण्यांत आली.

होमीयोपॅथीक डॉक्टरांच्या विषयाचे सिल्याबस व M.B.B.S. डॉक्टरांचे सिल्याबसचे विषय समान असुन शिक्षणाचा कालावधी सुध्दा सारखाच आहे. फक्त मॉडर्न फॉर्मकोलाजी हा विषय नसल्यामुळे शासनाने 1 वर्षाचा C.C.M.P. कोर्स होमीयोपैथीक डॉक्टरांना करायला लावुन त्यांचे वरील विषयाचे ज्ञान अपडेट करण्यांत आले. वरील अभ्यासक्रमाला शासनाच्या दोन्ही सभागृहाने मंजुरी दिली व आरोग्य विज्ञान विद्यापीठ

नाशिक (M.U.H.S.) यांना पुढील कार्यवाही करीता अधिकार देण्यांत आले त्यानुसार जेथे M.B.B.S. चे विद्यार्थी शिकतात त्याच महाविद्यालयात व त्यांनाच शिकवणा-या शिक्षकांकडुन वरील अभ्यासकमचे शिक्षण देण्यांत आले.

C.C.M.P. उत्तीर्ण डॉक्टरांना महाराष्ट्र वैधक परीषद (M.M.C.) मध्ये नोंदणी करण्याची मागणी मागील 8 वर्षापासुन सतत होती ती आता पूर्ण झाली असुन M.M.C. ने 30 जुन 2025 रोजी या संबंधीची अधिसुचना प्रसिध्द करूण 15 जुलै 2025 पासुन स्वतंत्र नोंदवहीत नोंद करण्यांची प्रक्रीया सुरू केलेली आहे. व त्यांस M.M.C. मधील शेडयुल 28 अंतर्गत स्वतंत्र नोंदणी पुस्तीका वेगळी ठेवण्याची तरतुद केली आहे.

शासनाने पारीत केलेल्या विधेयकांच्या विरोधात व होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथिकची प्रॅक्टीस तसेच M.M.C. मध्ये नोंदणीला विरोध केलेला आहे. या संदर्भात I.M.A. ही संघटना उच्च न्यायालयात गेलेली असुन वरील विषय न्यायप्रविष्ट आहे. तसेच या संदर्भात त्यांना कुठलाही स्टे मिळालेल नाही.

M.B.B.S. च्या सिल्याबसनुसार फार्मकोलॉजी हा विषय एकच वर्षाचा आहे, व होमीयोपॅथीक डॉक्टरांचा देखील एकच वर्षाचा आहे त्यामुळे तुलना करणे चुकीचे आहे.

I.M.A. संघटनेचा शासनावर असा आरोप आहे की, C.C.M.P कोर्स केलेल्या डॉक्टरांना अॅलोपैथीक ची प्रॅक्टिस करू दिल्यास रुग्णांच्या जीवनाशी खेळ खेळल्या सारखे होईल परंतु हा आरोप चुकीचा आहे. कारण नागपुरात मोठे हॉस्पीटल व नर्सिंग होम असे मिळून एकूण 530 आहेत व त्यात हजारो होमियोपॅथीक डॉक्टर R.M.O. (Resident Medical officer) पदावर कार्यरत असून ते त्या हास्पीटलमध्ये अलॉपैथीकची सेवा देतात. परंतु तेच डॉक्टर जेव्हा बाहेर प्रॅक्टीस करतात तेव्हा ते अवैध का ठरावे. बाहेर प्रॅक्टिस करतात तेव्हा रुग्णांच्या जीवाशी खेळतात मग हॉस्पिटलमध्ये आर एम ओ पदावर काम करून प्रॅक्टिस करतात तेथे रुग्ण नसतात का, असा सवाल होमिओपॅथिक संघटनेने उपस्थित केला आहे

वास्तविक शेडयुल 28 हे केवळ C.C.M.P. उत्तीर्ण डॉक्टरांच्या नोंदणीकरिता स्वतंत्र नोंदणी पुस्तिका असल्यामुळे I.M.A. च्या हक्काला व अस्मीतेला बाधा पोहचत नाही. त्यामुळे I.M.A. संघटनेने शासन निर्णयाला विरोध करू नये व शासनानी M.M.C. मध्ये नोंदणी संबंधी घेतलेला निर्णय बदलु नये अशी मागनी HIMPAN संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत यांनी केली आहे.

पत्रपरीषदेला संघटनेचे सचिव डॉ. आनंद गादेवार, डॉ. रविन्द्र पारख, डॉ.डी.बी. चौधरी, डॉ. बी. के. चौधरी, डॉ. राजेश रथकंठीवार, डॉ. छाया दुरूगकर, डॉ. अरविंद बुटले, डॉ. प्रवीण पारख, डॉ. संजय सहारे, डॉ. कुशल नारनवरे, डॉ. राजेश काळे, डॉ. नीलेश वाडीभस्मे, डॉ. ओम शेंडवरे, उपस्थित होते. डॉ सामडे, डॉ गवळी, डॉ अनासाने डॉ वासंती राऊन, डॉ सुरेखा रंगारी आदी उपस्थित होते. 

————–

 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 2 9 1

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे