ज्योतिबा माध्यमिक विद्यालयातील प्रवेश उत्सव सोहळा

ज्योतिबा माध्यमिक विद्यालयातील प्रवेश उत्सव सोहळा
नागपूर/विशेष प्रतिनिधी
लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थाद्वारा संचालित प्रवेश उत्सवात जिल्हा परिषद युडाईस अधिकारी माननीय श्री.शेंडे, प्राचार्या सौ.अरुणा कडू ,पर्यवेक्षक श्री.वांढे,पल्लवी प्रा. वि. मु. सौ.मांजरखेडे यांच्या तसेच सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक होती. शिक्षकांनी प्रवेश उत्सवाकरिता उत्कृष्ट सजावट व रंगरंगावटकरून विद्यार्थ्यांचे सजावटीकडे लक्ष केंद्रित केले. कार्यक्रमाच्या आयोजिका सौ.अरुणा कडू , श्री.वांढे सर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व खाऊ देऊन शाळेचा प्रवेशोत्सव अविस्मरणीय आनंददायी झाला. कार्यक्रमाचे संचालन सौ.मेंढेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सौ.साटोणे व इतर शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.