“शिक्षणासोबत धर्माचं ज्ञानही आवश्यक” : अमोल पुसदकर

“शिक्षणासोबत धर्माचं ज्ञानही आवश्यक” : अमोल पुसदकर
नागपूर/विशेष प्रतिनिधी
श्री दिगंबर जैन युवक मंडळ (सैतवाल) आणि महिला शाखा तसेच स्व. गंगाबाई लक्ष्मणराव श्रावणे एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणगौरव सोहळ्यात १०वी, १२वी तसेच पदवीधर आणि उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रम श्री सैतवाल जैन संगठन मंडळ, ग्रेट नाग रोड, महावीर नगर, नागपूर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक श्री विनोद बाबू श्रावणे (ट्रस्टी, स्व. गंगाबाई श्रावणे एज्युकेशन ट्रस्ट) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्री सुभाष मचाले (कार्याध्यक्ष, श्री सैतवाल जैन संगठन मंडळ) होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध लेखक व प्रेरणादायी वक्ते श्री अमोल पुसदकर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून श्री श्रीकांत मानेकर (कोषाध्यक्ष, श्री जैन संगठन मंडळ), संस्था अध्यक्ष प्रशांत भुसारी, उपाध्यक्ष श्रीकांत धोपाडे प्रमुख उपस्थितीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रेरणागीताने झाली. गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख वक्ता अमोल पुसदकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत धर्म आणि इतिहासाचे महत्त्व पटवून देत यशस्वी जीवनासाठी प्रेरणादायी विचार मांडले. अध्यक्ष सुभाष मचाले यांनी पालकांच्या भूमिकेचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्रीकांत मानेकर यांनी संस्थेच्या ३७ वर्षांच्या सेवाभावाचे कौतुक केले. उपाध्यक्ष श्रीकांत धोपाडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विशेष उल्लेख –
१०वी (महाराष्ट्र बोर्ड): आस्था उबाळे (९७.८%), आर्या बंड (९७.२%)
१०वी (CBSE): नेहल मांडवगडे (९८.८%), हर्षिणी कापसे (९६.८%)
१२वी (महाराष्ट्र बोर्ड): चारुल विटाळकर (९६.१७%), तनिष्का आगरकर (९२.३३%)
१२वी (CBSE): मनन जैन (९५.२%), आर्या मानेकर (९१.४%)
उच्च शिक्षण: डॉ. सिद्धांत पिंजरकर (PhD – Astronomy & Astrophysics, UK), डॉ. समृद्धी भुसारी (B.P.Th – Physiotherapy)
कार्यक्रमाचे संचालन प्रमोद भागवतकर व मायाताई सावलकर यांनी केले. प्रस्ताविक उमेश फुलंबरकर यांनी व आभार प्रदर्शन राजेश जैन यांनी केले. विद्यार्थ्यांची यादी संध्या काळे, भारती उबाळे, वीणा झवेरी आणि मनीषा सावलकर यांनी वाचून सुनावली.
कार्यक्रमात मोलाचा सहभाग देणाऱ्या संस्था:
श्री पार्श्वप्रभु दिगंबर जैन मंदिर इतवारी, श्री चंद्रप्रभु मंदिर बाहुबली नगर, श्री आदिनाथ मंदिर अंबा नगर, जैन सहायता ट्रस्ट, महावीर यूथ क्लब, पुलक जनचेतना मंच, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था, जैन एम्पावरमेंट ऑर्गनायझेशन आणि सर्व संबंधित मंदिर समितीचे विश्वस्त, पदाधिकारी, समाजसेवक व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला शाखेच्या जयश्री भुसारी, वर्षा महात्मे, वैशाली मानेकर, नंदा सोईतकर, मीनल आगरकर, स्मिता महात्मे, माधुरी भुसारी तसेच धनराज गडेकर, संतोष सावलकर, किशोर महात्मे, किरण मसालकर, सचिन नखाते यांचे विशेष योगदान लाभले.