Breaking
गुन्हेगारी

मुलानेच वडिलांना यमसदनी पाठविले !  पाय दाबायला नकार दिल्याने मुलाने केला खून

0 1 8 5 2 0

 मुलानेच वडिलांना यमसदनी पाठविले !  पाय दाबायला नकार दिल्याने मुलाने केला खून 

तीन लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त : आरोपीला अटक

कर्मचा-यांनीच लांबविली ऑफीस मधील रोकड

भूखंड खरेदीत ९ लाखांची फसवणूक – बनावट कागदपत्रांवरून भूखंड भासवला मालकीचा

नागपूर/E T News

६२ वर्षाच्या वडिलांना मुलाने पाय दाबायला लावले. वडिलांनी नकार दिल्यावर चिडलेल्या मुलाने वडिलांवर थेठ जीवघेणा हल्लाच चढविला. गुंड प्रवृत्तीचा असलेल्या मुलाने वडिलांच्या वयाचा विचार न करता त्यांच्या छातीवर, पोटावर, डोक्यावर, बरगड्यांवर तसेच नाकावर हाताबुक्यांनी, लाथांनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा यात मृत्यू झाला. कोतवाली ठाण्यांतर्गत ही घटना घडली. दत्तात्रय बाळकृष्ण शेंडे (६२) असे मृतक वडिलांचे नाव आहे. तर, कुशल उर्फ इंगा दत्तात्रय शेंडे (३३, रा. फ्लॅट क्र .१ करण अपार्टमेंट नवाबपुरा) असे मुलाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

करण अपार्टमेंट नवाबपुरा येथे शेंडे कुटुंबिय वास्तव्याला आहेत. घरी दत्तात्रय हे त्यांचा मोठा मुलगा प्रणव (३५), लहान मुलगा कुशल उर्फ इंगा आणि भावाचा मुलगा चैतन्य उर्फ गणु अनिल शेंडे (२३) यांच्यासोबत राहतात. कुशलने शनिवारी दुपारी वडिल दत्तात्रय यांना पाय दाबण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी त्याला नकार दिला. यातूनच चिडलेल्या कुशलला राग आला. यातूनच त्याने वडिलांना शिविगाळकरत त्यांना जबर मारहाण केली. दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या दत्तात्रय यांना मोठा मुलगा प्रणव व चुलतभाऊ चैतन्य यांनी उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी दत्तात्रय यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक मनिषा काशीद यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहोचते झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने गोळा केले. यानंतर आरोपी कुशल याला ताब्यात घेतले. या प्रकरणी चुलत भाऊ प्रणव शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी कुशल विरुद्ध कलम १०३ (१), ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

सहा महिन्यांपूर्वीस कुशल सुटला होता तुरूंगातून

कुशल उर्फ इंगा हा कुख्यात गुन्हेगार आहे. तसेच तो विकृत स्वभावाचाही आहे. त्याच्या विरुद्ध एमपीडीए, खंडणी मागणे, आर्म्स अ‍ॅक्ट, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विकृत स्वभावामुळे त्याने आपल्या वृद्ध वडिलांचीच हत्या केली. महत्वाचे म्हणजे तो सहा महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटून आला आहे.


तीन लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त : आरोपीला अटक

शहरात ड्रग्जचे जहर पसरत चालले आहे. आल्या दिवसाला पोलिसांच्या कारवाईत तरुणार्इंजवळ ड्रग्ज आढळून येत असल्यामुळे नशेखोरीच्या प्रकारावर पायबंद कसा घालता येईल, असे आव्हान पोलिस प्रशासनाला आहे. मानकापूर पोलिसांनी अशाच एका तरुणाकडून ३ लाखांचे ड्रग्ज जप्त करत त्याला अटक केली आहे. स्वजल रमेश डुंभरे (३१, रा. प्लॉट नंबर ९, भिवगडे ले-आऊट, फरस चौक, मानकापूर) असे या आरोपीचे नाव आहे.

मानकापूर पोलिस पथकातील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत होते. भिवगडे ले-आऊट, फरस चौकात दुचाकी (एमएच ३१ ईडब्लू ३९३२) वर असलेल्या स्वजल डुंबरेवर पोलिसांना संशय आला. विचारपूस करत पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्याच्याजवळ ३ लाख रुपयांचे ३१ ग्रॅम ४५ मिली ग्रॅम एमडी पावडर आढळून आले. पोलिसांनी हे ड्रग्ज तसेच त्याची दुचाकी असा एकूण ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. १७ आॅगस्ट रोजी, दुपारी ४.२५ ते रात्री ७.२५ वाजताच्या दरम्यान, मानकापूर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी विरूद्ध कलम ८ (क), २२ (ब) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उप आयुक्त (परि. क्रमांक २), सहा. पोलिस आयुक्त (सदर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मीता जाधव, पोलिस निरीक्षक अमोल इंगोले (गुन्हे), सह पोलिस निरीक्षक विक्रांत धारकर, पोलिस उप निरीक्षक भलावी व पथकाने ही कारवाई केली.

———————————-

कर्मचा-यांनीच लांबविली ऑफीस मधील रोकड

आॅफिसमध्ये ठेवलेली रक्कम दोन कर्मचा-यांनी चोरून नेली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला. सीताबर्डी ठाण्यांतर्गत ही घटना घडली. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. संतोष संभाजी भलावी (३२, रा. तकिया, धंतोली) आणि मुकेश सुरेश सोनी (३४, रा. नरसाळा, हुडकेश्वर) अशी आरोपींची नावे आहेत.

शिवशक्ती अपार्टमेंट, भगवाननगर येथे राहणारे भुपेंद्र शेषराव सोनकुसरे (३४) यांचे रामदासपेठ येथील बिग बाजार बिल्डिंगच्या सहाव्या माळ्यावर त्यांचे बजाज अलायन्स लाईफ इंशोरंन्सचे कार्यालय आहे. त्यांनी ८ आॅगस्ट रोजी, आॅफिसमध्ये एका बॅगमध्ये २० हजार ५०० रुपये ठेवले होते. मात्र, ही रक्कम जेव्हा त्यांनी तपासली तेव्हा यातील १९ हजार ५०० रुपये गायब झाले होते. ही रक्कम कुणी काढली याकरिता त्यांनी आॅफिसमध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात संतोष आणि मुकेश हे दोघे बॅगमधील रक्कम चोरी करताना दिसून आले. त्यानंतर भुपेंद्र यादव सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ३०५ (अ), ३(५) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे.

——————————–

भूखंड खरेदीत ९ लाखांची फसवणूक – बनावट कागदपत्रांवरून भूखंड भासवला मालकीचा

भूखंड खरेदीत चार आरोपींनी मिळून एका व्यक्तीची ९ लाख १ हजारांची फसवणूक केली. बनावट कागदपत्रे दाखवत आरोपींनी भूखंड स्वमालकिचा भासवला. १८ लाखांत सौदा ठरला. ९ लाख १ हजार घेतले. विक्रीपत्रावेळी मात्र टाळाटाळ केली. हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडला. कलावती अरूण शिंदे (६९), पल्लवी श्रीकांत शिंदे (४४, दोन्ही रा. स्वागतनगर, न्यू नरसाळा), रमेश बबनराव ठाकरे (४५, रा. सुर्वे ले-आऊट, छोटा ताजबाग) आणि मुकुंद देहारे (५५, रा. ठवरे कॉलोनी, न्यू सुभेदार ले-आऊट) अशी आरोपींची नावे आहेत.

जंबोदीपनगरातील प्लॉट नंबर १५६ येथे राहणा-या फिर्यादी दिनेश महादेवराव कोहळे (४९) यांना भूखंड खरेदी करायचा होता. आरोपी मुकुंद देहारे त्यांचा परिचित होता. त्यांनी भूखंड खरेदीबाबत त्याला सांगितले होते. मुकुंदने आरोपी कलावती, पल्लवी तसेच रमेश याच्यासह मिळून दिनेश यांना एका भूखंडाची माहिती दिली. मुकुंदने त्यांना कलावतीच्या घरी आणले. निरंजन को-आॅपरेटिव्ह गृह निर्माण सोसायटी, येथील खसरा नंबर ७२/१, मधील भूखंड क्रमांक ४, (क्षेत्रफळ १५०० चौरस फुट) हा कलावतीच्या नावावर असल्याची माहिती दिली. कागदपत्रे दाखविली. भूखंड आवडल्याने दिनेश कोहळे यांनी खरेदीस होकार दिला. एकूण १९ लाखांत सौदा नक्की झाला. भूखंडाच्या करारनाम्यावेळी आरोपींनी चेक व डीडी द्वारे ९ लाख १ हजारांची रक्कम घेतली. ११ जानेवारी २०२३ ते १७ फेबु्रवारी २०२३ या दरम्यान, खरेदी-विक्रीचा हा व्यवहार झाला. यानंतर दिनेश यांनी विक्रीपत्र करून मागितले. परंतु, आरोपी त्यासाठी टाळाटाळ करू लागले. त्यांना शंका आल्याने त्यांनी भूखंडावर जाऊन खात्री केली असता तो दुस-यांच्याच मालकीचा असल्याचे समजले. आरोपींनी संगणमताने बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केली अशा दिनेश कोहळे यांच्या प्राप्त तक्रारीवरून तसेच अर्ज चौकशीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपींविरूध्द कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४७१, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

——————————————

 

 

5/5 - (1 vote)

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 5 2 0

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे