*तीन मैत्रिणींना भरधाव टाटा सुमोने उडवले *बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या वृद्धाचा मृत्यू *घरातून रोकडसह दागिने लांबविले
*तीन मैत्रिणींना भरधाव टाटा सुमोने उडवले *बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या वृद्धाचा मृत्यू *घरातून रोकडसह दागिने लांबविले
नागपूर/E T News
तीन मैत्रिणी रस्त्याने पायदळी जात असताना भरधाव टाटा सुमो चालकाने त्यांना धडक दिली आणि पळून गेला. अपघातात एक मैत्रिण गंभीर जर अन्य दोघींना किरकोळ मार लागला. तनवीर इंद्रजीत भल्ला (२०) असे गंभीर जखमी मैत्रिणीचे नाव आहे.
वर्धमाननगरातील प्लॉट. नंबर ९९ येथे राहणारी तनवीर ही शालीनीताई मेघे महाविद्यायात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ती रविवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास तिच्या दोन मैत्रिणीसोबत वासुदेव मेट्रो स्टेशन ते हल्दीरामच्या दुकाना पायदळी जात होते. यावेळी, भरधाव वेगाने (एम.एच. ४० बी.जी. ०४१६) क्रमांकाची टाटा सुमो आली. कार चालकाने त्याचे वाहन निष्काळजीपणे चालवत तनवीर तसेच तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीला धडक दिली आणि पळून गेला. अपघातात तिघेही जखमी झाले. त्यात तनवीरच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर दोन मैत्रिणी सुखरूप बचावत किरकोळ जखमी झाल्या. जखमी अवस्थेत तनवीरला शालीनीताई मेघे रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तनवीरने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी सुमो वाहन चालका विरूद्ध कलम २८१, १२५(१) (२) भादंवि सहकलम १८४ मो.वा. का अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या वृद्धाचा मृत्यू
शहरातील अजनी पोलिस ठाण्यांतर्गत बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अज्ञात ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. माहितीनुसार, ५ आॅगस्ट रोजी, सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मेडिकल रुग्णालय संचालित औषधांच्या दुकानापुढे एक अनोळखी पुरूष ईसम बेशुध्द अवस्थेत मिळून आला. त्यांना उपचाराकरिता मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी रजत राजु बोरकर (२२, रा. खरबी, गरीब नवाज चौक) यांनी दिलेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतलेली आहे.
घरातून रोकडसह दागिने लांबविले
देवदर्शनासाठी गेलेल्या कल्पतरू अपार्टमेंटमधील आकांश नारायण धनगर यांच्या घरात चोरी झाली. चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेली रोकड आणि दागिने असा १ लाख ५ हजारांच्या मुद्देमालावर हातसाफ केला. रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास ही घटना ईमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
ईमावाडा येथील रामबागेतील अपार्टमेंटमध्ये राहणा-या आकांश धनगर (३५) या दत्तात्रयनगर येथे देवदर्शनाकरिता गेल्या होत्या. जाण्यापूर्वी त्यांनी घराच्या दाराला कुलूप लावले होते. दरम्यान, कुणीतरी अज्ञात चोरट्याने डाव साधला. चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील लोखंडी आलमारीत ठेवलेली ४० हजारांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी आकांश धनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून ईमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
————————————–
—–