Breaking
Breaking

डिक्की विदर्भ तर्फे व्यवसाय जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

0 2 0 2 9 1

डिक्की विदर्भ चैप्टर च्या वतीने  चंद्रपूर येथील हाय टेक इन्स्टिट्यूट येथे व्यावसायिक व नवीन व्यवसाय स्थापन करू इच्छिनाऱ्यासाठी व्यवसाय जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डिक्की महाराष्ट्र चे अध्यक्ष गोपाल वासनिक, डिक्की विदर्भ चे अध्यक्ष राजरत्न मेंढे, माजी अध्यक्ष विजय सोमकुवर, डिक्की विदर्भ कोर कमिटीचे सदस्य जितेंद्र मेश्राम, डिक्की चंद्रपूरचे समन्वयक राजा अडकीने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना गोपाल वासनिक यांनी सांगितले की, एससी एसटी वर्गातील तरुणांनी व्यवसायात येणे ही काळाची गरज असून डिक्की च्या सल्ल्याने सरकारने या समाजातील नवीन व्यवसाय करू इच्छिनाऱ्या तरुणासाठी विविध योजना आणल्या आहेत. व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टँड अप इंडिया योजना, वेंचर कॅपिटल फंड, तसेच क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी, सीएमइजीपी पीएमइजीपी योजना आहेत. त्याचप्रमाणे या व्यावसायिकानी बनविलेल्या उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी 5 टक्के खरेदी योजना आणली आहे. या योजनेनुसार सरकारने व सार्वजनिक उपक्रम कंपन्यांनी त्याच्या एकूण खरेदीच्या 5 टक्के एससी एसटी उत्पादकांकडून खरेदी करणे बंधनकारक केले आहे. एससी एसटी मधील तरुणासाठी इतरही अनेक प्रोत्साहनपर योजना असून या सर्वांबद्दल माहितीसाठी वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
राजरत्न मेंढे यांनी यावेळी डिक्कीचा उद्देश आणि विविध कार्याबद्दल माहिती दिली. विजय सोमकुवर यांनी यावेळी सरकारच्या विविध व्यवसाय प्रोत्साहनपर योजना आणि व्यवसायाला मिळणाऱ्या विविध शासकीय अनुदाना बद्दल माहिती दिली. जितेंद्र मेश्राम यांनी महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाच्या कार्यपद्धती बद्दल माहिती दिली. राजा अडकीने यांनी प्रास्ताविक केले व सर्व उपस्थित तसेच सर्व डिक्की पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

EVERY TIME NEWS Live

Santosh Singh Lanjewar/ Chief Editor/ B.A; B. J. (Bachlor of Journalism) MSW (Master of Social work), E T News Channel & " Every Time News Live " News Website Portal/ Facebook Page : ET News Network/ Email : shan.lanjewar@gmail.com/ Cell : +91 738 738 00 22/Experience in Print Media Past 40 years Served : नागपूर पत्रिका # लोकसत्ता # सामना # नवराष्ट्र # निर्मल महाराष्ट्र # लोकमत # लोकमत समाचार # तरुण भारत # देशोन्नती # महासागर # लोकशाही वार्ता & Continue Every Time News Network/ Office : Vidarbha Sahitya Sangh Commercial Complex Jhanshi Rani Square, Sitabuldi, Nagpur

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे